आमदार राम भाऊ सातपुते हेच मातंग समाजाला न्याय मिळवून देतील -आबासाहेब भिसे
माळशिरस (प्रतिनिधि ) मुंबई येथे चालू असलेल्या अधिवेशनामध्ये माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी मातंग समजाच्या विषयी तारांकित प्रश्न मांडले. यामध्ये मातंग समजाला मुख्य प्रवाहात त्यांनी बार्टीच्या धरतीवर मातंग समाजासाठी स्वतंत्र नवीन संस्था सुरु करावी अशी मागणी केली. त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी 1881ला आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी अशी अशी सिंह गर्जना करणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रपुरुषा च्या यादिमध्ये समाविष्ट करावे.लहुजी वस्ताद साळवे यांचे यांचे देशासाठी अमूल्य असे योगदान लाभले आहे. तर साहित्य रत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपल्या देशाचे नाव जगभरात केलेले आहे. अशा थोर साहित्य रत्न आणाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा. अशी मागणी आमदार राम भाऊ सातपुते यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळे केवळ मतदार संघातील मातंग समाजाला नव्हे तर महाराष्ट्रतील तमाम मातंग समाजाला आनंद झालेला आहे. अशी माहिती आमदार राम सातपुते यांचे कट्टर समर्थक आबासाहेब भिसे यांनी दिली.यावेळी बोलताना आबासाहेब भिसे म्हणाले की मातंग समाजाच्या असलेल्या अनेक प्रलंबीत मागन्या आमचे नेते आमदार राम भाऊ सातपुते यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितले. तर माळशिरस तालुक्यातील मातंग समाज बांधवा मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राम सातपुते साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी नीलकंठ जगताप, आबासाहेब भिसे, महावीर नामदास, उपस्थित होते.








