खंडाळी येथे झालेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी नारायण पताळे यांना जामीन मंजूर
खंडाळी येथे दि 19/11/2022 रोजी पूर्ववैमनस्यातून कळशी फेकून मारलेचा राग मनात धरून रामचंद्र पताळे यांचा पाण्याच्या दंडा मध्ये पालथे पडून मानेवर पाय देऊन श्वास कोंडून नारायण पताळे याने खून केल्याचा आरोप सरकारी पक्षा तर्फे ठेवण्यात आला होता.तर आरोपी तर्फे वकील ॲड. सागर जाधव यांनी आरोपी याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही, पोस्टमोर्टेम रिपोर्ट मध्ये मेंदूतील रक्त स्राव झाल्याने मृत्यू झाला असल्याचे तसेच प्रथम दर्शनी साक्षीदार यांच्या जबाबात असणारी तफावत हे मुद्दे व असे अनेक मुद्दे युक्ती वाद करून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.युक्ति वादातील सर्व मुद्दे लक्षात घेता माळशिरस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एन.पाटील यांनी आरोपी नारायण पताळे याचा जामीन अर्ज मंजूर केला.यावेळी सरकारी पक्षा तर्फे ॲड ढवळे यांनी काम पाहिले तर आरोपी तर्फे ॲड. सागर जाधव ॲड विपुल पवार व ॲड महादेव पवार यांनी काम पाहिले.






