ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यातून चौघांची निर्दोष मुक्तता; माळशिरस सत्र न्यायालयाचा निकाल.
माळशिरसः-शेतीच्या संबंधीत वादातून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खटल्यातून माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर व अन्य तिघांची माळशिरस सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश एम एन पाटील यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली.खुडुस (ता.माळशिरस) येथे नोहेंबर 2013 या महिन्यात हा गुन्हा घडला होता.शेतजमीनी सबंधीतच्या वादातून हा प्रकार घडला होता.याप्रकरणी दाखल फिर्यादीवरुन माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर व इतर तिघांविरोधात माळशिरस पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पुरावा सादर करण्यात सरकारी पक्षाला अपयशहा खटला माळशिरस सत्र न्यायालयात सुरु होता.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.तत्कालीन तपास अधिकारी यांची पन साक्ष यात नोंदवली होती.पुरेसा पुरावा सरकारी पक्ष न्यायालयात सिद्ध करु शकले नाही,असा युक्तीवाद आरोपीच्या वकीलांनी केला.आरोपीचे राजकीय प्राबल्य वाढत असल्याच्या रागातून फिर्यादी यांनी केवळ त्रास देण्यासाठी फिर्याद दिल्याचे अॅड.पृथ्वीराज कोल्हटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.तसेच आरोपीला या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा केलेला युक्तिवाद, त्याबाबत सादर केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करून न्या.एम.एन.पाटील यांनी आरोपी तुकाराम कोल्हटकर,नामदेव कोल्हटकर,माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर कोल्हटकर व भाऊसाहेब मदने यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. यावेळी सदर आरोपी कडुन मुबंई उच्च न्यायालयाचे अॅड.जगदिश शिंगाडे,अॅड कन्हैय्या सोनवलकर,अॅड पृथ्वीराज कोल्हटकर तसेच अॅड.आप्पाराव वाघमोडे व सांगलीचे अॅड.पाटील (बाबा) यांनी कामकाज पाहिले.







