मुलांनो बोर्ड परीक्षेला घाबरू नका – केंद्रप्रमुख दत्तात्रय घंटे
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यालयाचे उप मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख दत्तात्रय घंटे सर, उच्च माध्यमिक विभागप्रमुख शिंदे सर, करंडे मॅडम, पर्यवेक्षक व शिक्षकांनी गुलाब पुष्प व पेढे देऊन केले. केंद्रप्रमुख दत्तात्रय घंटे सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व सांगितले त्यात आयुष्यात दहावी परीक्षेला तर खुप महत्त्व दिले जाते. बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव घेतलेला असतो, पण दहावीचे विद्यार्थी ‘बोर्ड’ या नावानेच अर्धे घाबरलेले असतात. त्यामुळे चांगला अभ्यास, पाठांतर करूनही उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे लिहिता येत नाही. त्यामुळे गुण कमी पडतात. मुलांची बोर्डाची भीती दूर व्हावी आणि उत्तम पद्धतीने उत्तरे लिहावी थोडक्यात सांगून शुभेच्छा दिल्या. तसेच प्रश्नपत्रिका मिळताच सर्व प्रश्नांवर नजर फिरवून तुम्हाला एकूण प्रश्नांपैकी जो तुम्हाला सोपा वाटतोय व पूर्ण प्रश्नाचे उत्तर लिहिता येतेय तो प्रश्न लिहिण्यास घ्या. उत्तर येतंय म्हणून घाई करू नका. प्रश्न वाचून समजून घ्या कारण घाईघाईत वाचन केल्याने मुख्य मुद्दा दुर्लक्षित राहुन उत्तर चुकू शकते. बोर्डाने कुठेही असे सांगितले नाही की प्रश्न क्रमांकानुसारच उत्तरपत्रिका सोडवा. तुम्हाला जो प्रश्न आवडेल, सोपा वाटेल तो सोडवा. खात्री असलेले प्रश्न आधी सोडवावे. त्यामुळे पेपर तपासणाऱ्यावर चांगले ‘इम्प्रेशन’ पडेल. या केंद्रावर १० वी बोर्ड परीक्षेसाठी ५६० विद्यार्थी बसले आहेत. बोर्डाच्या नियमाप्रमाणे सर्व व्यवस्था केलेली आहे.







