त्रिमूर्ती स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल पै. राजवीर मोरे याचे सर्व स्तरातून कौतुक

अकलूज (प्रतिनिधी )अकलूज (शंकरनगर )येथे झालेल्या त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेत 35किलो वजन गटात शिवरत्न कुस्ती केंद्राचा पै. राजवीर दुर्योधन मोरे हा पहिला आला. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या.कुस्तीची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ जिद्द आणि चिकाटी च्या बळावर त्याने हे यश संपादन केले आहे.राजवीर हा केवळ 11वर्षांचा असून, तो स. मा. वी येथे इयत्ता पाचवीत शिकत आहे. आपला शालेय अभ्यास करून तो आपले कोच सुहास तरंगे आणि काका जगदाळे यांच्या मार्गदर्शन खाली कुस्तीचे धडे गिरवीत आहे. माळशिरस पंचायत समिती चे माजी सदस्य राजाराम खंडागळे यांचा तो नातू असून, आजोबा राजाराम खंडागळे, आजी महानंदा खंडागळे, सुहास, अमर, राहुल, मीराज, असे चार मामा, मोठा भाऊ राजवर्धन मोरे आई शुभांगी मोरे हे सर्वजण त्याचा सराव घेत आहेत.कुस्ती क्षेत्रातील सुशीलकुमार आणि राहुल आवारे हे त्याचे आदर्श आहेत. त्यांच्या पावलावर वाटचाल करीत तो कुस्ती चे धडे गिरवीत आहे.2018मध्ये अवघे 7वर्षे वय असताना त्याने पहिली कुस्ती खेळली. आणि त्यात तो जिंकला देखील. तेव्हापासून त्याने मागे वळून पहिलेच नाही. त्याने आजपर्यंत अनेक ठिकाणी कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊन कुस्ती जिंकली आहे.यावर्षी सुद्धा प्रथमच त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. भविष्यात त्याला 14वर्षे वयोगटा च्या खाली राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवायचे आहे. असे तो आवर्जून सांगतो. तसेच आपल्या या यशात आजोबा, आजी,प्रशिक्षक, चार मामा आणि आई चा मोठा वाटा असल्याचे तो सांगतो.दरम्यान त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक आणि मानसन्मान होत आहे.










