• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home शैक्षणिक

स. मा. वी. चे मुख्याध्यापक प्रताप पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त मोहिते पाटील परिवारांच्या वतीने सन्मान

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 27, 2023
in शैक्षणिक
0
स. मा. वी. चे मुख्याध्यापक प्रताप पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त मोहिते पाटील परिवारांच्या वतीने सन्मान
0
SHARES
481
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स. मा. वी. चे मुख्याध्यापक प्रताप पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त मोहिते पाटील परिवारांच्या वतीने सन्मान

अकलूज (प्रतिनिधी )शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज चे मुख्याध्यापक, राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य प्रताप शहाजीराव पाटील हे संस्थेतील विविध शाखेतून ३३ वर्ष ८ महिने ९ दिवस सेवा करून नियत वयोमानानुसार २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.याप्रित्यर्थ त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता .यावेळी सत्कारमूर्ती पाटील सरांचा सहकुटुंब सत्कार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, शि. प्र. मंडळ, अकलूज चे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील या मान्यवरांच्या हस्ते व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, युवा नेते चि. सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील, दिपकराव खराडे, पाटील, माजी जि.प सदस्य सतीशराव माने देशमुख, महर्षी प्रशालेचे सभापती अॅड.नितीनराव खराडे-पाटील, संस्थेचे सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,संचालक सुभाष दळवी , वसंत जाधव , रामचंद्र गायकवाड , नारायण फुले , बाळासाहेब सणस , राजाभाऊ लव्हाळे , उत्कर्ष शेटे , निशा गिरमे , पांडुरंग एकतपुरे , महादेव अंधारे , विजयकुमार दोशी आदीसह विविध संस्थाचे पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रास्ताविकात विद्यालयाचे उपमुख्याध्यापक .घंटे सर यांनी पाटील सरांचा जीवन परिचय देऊन त्यांच्या शैक्षणिक सेवेची व कार्याची ओळख करून दिली. पाटील परिवाराचे वतीने बाळदादांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थी मनोगतामध्ये कु. प्रेरणा गायकवाड हिने स्वरचित ‘सर’ ही कविता सादर करून पाटील सरांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून दिली. शिक्षक मनोगतातून सौ.सुनीता ठोंबरे व राजेंद्र धोत्रे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर मा. जि. प. सदस्य व वेळापूर शाखेचे सभापती सतीशराव माने -देशमुख यांनीही सरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पैलूचे कौतुक आपल्या भाषणातून केले. मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी पाटील सरांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याचे व मुख्याध्यापक पदावर केलेल्या सेवेचे कौतुक केले तसेच संस्थेसाठी, प्रताप क्रीडा मंडळासाठी दिलेल्या योगदानाचे भरभरून कौतुक केले.यानंतर सत्कारमूर्ती पाटील सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणामध्ये जीवनामध्ये सहकार महर्षीच्या कार्याची प्रेरणा घेऊनच कार्य केले हे सांगून मोहिते-पाटील परिवाराने, संस्थेने जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पडल्याची पोहोचपावती या स्नेह सत्कारातून मिळाली हे सांगितले. तसेच शैक्षणिक वाटचालीतील विविध प्रसंग व अनुभव याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा.जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी सरांच्या सृजनशील व्यक्तिमत्वाचे कौतुक करून संस्थेने आयोजित केलेल्या विविध उपक्रमामधून त्यांना दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याचे सांगून त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच निवृत्तीनंतर संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची जबाबदारी समर्थपणे स्वीकारावी हे सांगितले. प्रभावी नेतृत्वाचे कौतुक करताना राजकीय क्षेत्रासाठीही आपले व्यक्तिमत्व अनुकूल असून ‘ माढा मतदार संघाचे भावी आमदार’ असा नामोल्लेख केला.या कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, प्राचार्य दत्तात्रय बागडे सर, माजी प्राचार्य आबासाहेब देशमुख, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर, विद्यार्थी, मित्रमंडळी, पै पाहुणे, हितचिंतक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन पोपट पवार, राजकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमांची सांगता सारे जहाँ से अच्छा या देशभक्तीपर गीताने झाली. शेवटी पाटील सरांच्या वतीने सर्वांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

अकलूजमध्ये  ‘अबॅकस ग्रँड चॅम्पियनशिप २०२६’चे ;                  २५ डिसेंबरला स्मृतिभवन येथे भव्य आयोजन!                                         महाराष्ट्र टीचर्स अबॅकस असोसिएशन आणि आय-चॅम्प अबॅकस प्रा. लि. यांचा संयुक्त उपक्रम;                                              विद्यार्थ्यांना गणितीय कौशल्ये सिद्ध करण्याची संधी
शैक्षणिक

October 22, 2026
सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ!          माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान;                                                       पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सरस्वती पूजनाने सेवा संकल्प कार्यक्रमाचा शुभारंभ! माळीनगर येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान; पौष्टिक आहार व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 15, 2026
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न
शैक्षणिक

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे ‘सृजनरंग महोत्सव” अंतर्गत मेहंदी स्पर्धा संपन्न

October 13, 2026
पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश
शैक्षणिक

पुणे येथील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अकलूजच्या आय चॅम्प अबॅकसचे घवघवीत यश

August 31, 2026
सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शैक्षणिक

सृजनरंग महोत्सवांतर्गत फोटोग्राफी स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 22, 2026
प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू     स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध
शैक्षणिक

प्रथम व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रक्रिया दि.२० ऑगस्ट पासून सुरू स्वेरीकडून विविध ठिकाणी ही सुविधा मोफत उपलब्ध

August 19, 2026
Next Post
शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा झाला ‘मराठी राजभाषा दिन’

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा झाला 'मराठी राजभाषा दिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In