*सहकार महर्षी कारखान्याकडून मयत सभासदांच्या वारसांना आधार*मयत सभासदाच्या वारसांना धनादेश सुपूर्द
संग्रामनगर दि.२३ (संजय लोहकरे यांजकडून)सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगरच्या मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते विमा कंपनीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सभासद हा कारखान्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक समजला जातो.त्याची सुरक्षितता महत्वाची आहे या दृष्टिकोनातून सहकार महर्षीचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून १७० रुपयांचा तीन वर्षासाठीचा विमा उतरवला आहे. यामध्ये कारखान्याच्या जवळपास १० हजार ४१३ सभासदांनी भाग घेतला.या विम्यामध्ये अपघाती मृत्यू अपंगत्व कायमचे अपंगत्व अशा प्रकारचा समावेश होतो. सन १९९९ ते चालू २०२३ पर्यंत ९८ सभासदांना जवळपास १ कोटी ८ लाख ४४ हजार विमा क्लेमचा आजपर्यंत फायदा मिळालेला आहे.नुकतेच अपघाती निधन झालेल्या कै.जनार्दन रंगनाथ भांगे राहणार माळखांबी व कै.श्रीरंग दामू हांगे रा.लाखेवाडी या मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी तीन लाख रुपये असा धनादेश कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, सेक्रेटरी अभयसिंह माने देशमुख,चिफ अकौंटंट युवराज इनामदार,विमा कंपनीचे प्रतिनिधी प्रकाश वाघमोडे,प्रकाश एकविरे आदी मान्यवर उपस्थित होते. सभासदांचे विमा क्लेम उतरवून कारखान्याने सामाजिक जबाबदारीची भावना जपली आहे.मयत कुटुंबाच्या वारसांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.त्यामुळे सभासद वर्गातून चेअरमन जयसिंह मोहिते पाटील व सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले जात आहेत.







