*प्रेमरंग या वेब फिल्मच्या पोस्टरचे अनावरण विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न.*
संग्रामनगर दि.२४ (संजय लोहकरे यांजकडून)वेब फिल्मच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उदयमुख कलाकरांना नवीन व्यासपीठ मिळवत असल्यामुळे यातून भावी कलाकार जन्मास येत आहेत.हे कलाकार कोणत्या मानधनाची अपेक्षा न ठेवता ग्रामीण भागातील रसिकांचे मनोरंजन करत आहेत असे उदगार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रेमरंग वेब फिल्मच्या पोस्टरच्या अनावरण प्रसंगी व्यक्त केले. इस्कुटवाडी वेबचे तसेच प्रेम रंग या नवीन येणा-या वेब फिल्मच्या पोस्टरचे अनावरण विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी विजय दादांनी यांनी वेब सिरीजच्या नवोदित कलाकारांचे कौतुक केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रेमरंग या वेब सिरीजबद्दल माहिती देताना सहनिर्माता व लोकेशन हेड सिध्देश्वर शिंदे यांनी सांगितले की,केवळ मनोरंजनासाठी ही फिल्म बनवीत असून स्थानिक कलाकार यामध्ये आपली कला सादर करीत आहेत.या फिल्मचे लेखक/निर्माता/दिग्दर्शकाची बाजू यशवंत मस्के संभाळत आहेत तर सहनिर्माता व लोकेशन हेडचे काम सिध्देश्वर शिंदे पहात आहेत.यात कलाकार म्हणून कु.श्रावणी शिरोळकर,सौ.पुजा ठाकर,दत्ता ठाकर,सुयश काजवे सर्व रा.पुणे तर यशवंत मस्के, सिध्देश्वर शिंदे,पंढरीनाथ थोरात, नंदिनी नरूटे,प्रणव शिंदे,राजेंद्र नरूटे,सर्व माळेवाडी-अकलूज येथील असून कॅमेरामन म्हणून प्रमोद गव्हाणे काम पहात आहेत.या वेब फिल्मचे चित्रीकरणाचे स्थळ शिवामृत गार्डन व राजेंद्र नरूटे वस्ती माळेवाडी-अकलूज असून अकलूज व माळेवाडीतील ग्रामस्थांचे भरपूर सहकार्य मिळत आहे. यावेळी पत्रकार चंद्रकांत कुंभार,रोहन मस्के,ऋषी वायकर,यश शिंदे,अक्षय नवले आदी उपस्थित होते.











