शंकरनगरच्या त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धेत कालीचरण सोलनकर ठरला विजेता.
अकलूज (प्रतिनिधी)
शंकरनगर येथे झालेल्या त्रिमूर्ती केसरी स्पर्धेमध्ये साडेसहा फूट उंच व शक्तिशाली वैभव माने समोर चपळ कालीचरण सोलनकर असा रोमहर्षरक खेळ रंगला होता होता.सुरुवाती पासूनच आक्रमक खेळ करत चतुराईने कालीचरणने वैभवला झुंजवत ठेवले.अत्यंत चुरशीच्या झालेल्या कुस्तीमध्ये कालीचरणने वैभव मानेवर एका गुणाची वरकमाई करुन त्रिमूर्ती केसरीचा बहुमान पटकावला.
महाशिवरात्र यात्रेनिमित्त शंकरनगर-अकलूज येथील शिवतीर्थ आखाड्यात कर्मवीर कै.बाबासाहेब माने पाटील,सहकार महर्षी कै.शंकराव मोहिते पाटील व धर्मवीर कै.सदाशिवराव माने पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दि.१७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सालाबादप्रमाणे त्रिमूर्ती केसरी किताबासाठीच्या कुस्ती स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उदघाटन सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.एक लाख रुपये रोख व त्रिमूर्ती चषकासाठी सहाव्या फेरीनंतर वैभव माने व कालीचरण सोनकर हे एकमेकांसमोर आले होते.पहिल्या २० मिनिटांमध्ये दोघांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला.यावेळी कालीचरण सतत वैभवचा पट काढण्याचा प्रयत्न करत होता,परंतु वैभवने त्याला दाद दिली नाही.वेळेत कुस्ती न झालेने पंचाच्या निर्णयानुसार गुणावर कुस्ती लावली त्यावेळी वैभवने पहीला डाव टाकत ६ गुण मिळवत आघाडी घेतली.परंतु ही आघाडी त्याला जास्त वेळ टिकवून ठेवता आली नाही.कालीचरणने प्रतिडाव टाकत वैभववर कब्जा घेत ६ गुण मिळविले.त्यानंतर वैभवने पुन्हा दोन गुण घेतले.पण कालीचरणने परत कब्जा घेत गुणांची बरोबरी केली.त्यानंतर परत दोघांनी दोन दोन गुण घेतले.दोघांची गुणसंख्या बरोबरीची असताना बाजी कोण मारणार याकडे गर्दीने खचाखच भरलेले प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला असतानाच शेवटच्या क्षणाला कालीचरणने अत्यंत चपळाईने एक गुण घेत यंदाचा त्रिमूर्ती केसरीचा किताब पटकावला.माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जयसिंह मोहिते-पाटील,मदनसिंह मोहिते-पाटील,सयाजीराजे मोहिते-पाटील यांचे हास्ते कालीचरणला त्रिमूर्ती केसरी किताब तर वैभव मानेस उपविजेता किताब देवुन गौरवण्यात आले.
सदर कुस्ती स्पर्धा प्रसंगी धैर्यशील मोहिते-पाटील,स्वरूपाराणी मोहिते-पाटील,संग्रामसिंह मोहिते-पाटील,राजेंद्र चौगुले,पोपटराव भोसले,वसंत जाधव,अभयसिंह माने-देशमुख,सहकार महर्षी कारखान्याचे संचालक,प्रताप क्रीडा मंडळ सदस्य,यात्रा कमिटीचे सदस्य उपस्थित वजन गटातील कुस्ती स्पर्धुत विजेते पुढील प्रमाणे मल्ल विजयी झाले.
२५ किलो संग्राम जाधव (रुई), २८ किलो-आदित्य सावंत (इंदापूर),३० किलो- सुजल गोर (खुडूस),३२ किलो-हर्षवर्धन पवार (वडूज),३५ किलो- राजवीर मोरे (अकलूज),४० किलो प्रणव हिमने (शिरवाडे), ४५ किलो-यशराज मोरे (अकलूज),५० किलो-विवेक सातपुते (म्हसवड),५५ किलो- विशाल सुरवसे (खुडूस),६० किलो-विशाल रूपनवर (म्हसवड),६५ किलो-विकी कडे (नातेपुते),७० किलो-किरण राणे (नातेपुते),७५ किलो- संदेश शिपकुले (फलटण),40 किलो किरण माने (जेऊर), ८५ किलो- अविनाश गावडे(सराटी)







