अमित शहा यांचेवर गुन्हा दाखल करा माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने अकलूज पोलीस ठाणेत निवेदन
अकलूज (प्रतिनिधी )भाजपचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर मध्ये जे वक्तव्य केले त्या वक्तव्याचा शिवसेना माळशिरस तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला.. वंदनीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे विषयी अत्यंत खालच्या भाषेत टिका केली,त्यामुळे समस्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत,म्हनुन जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांचे मार्गदर्शना खाली शिवसेना माळशिरस तालुका यांचेवतीने अमित शहा यांचेवर गुन्हा दाखल करण्यासाठी अकलूज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष(भैय्या) राऊत, तालुका उपप्रमुख महादेव बंडगर, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख उमेश(भाऊ) जाधव,शिवसेना अकलूज शहर प्रमुख अनिल(भाऊ) बनपट्टे, युवासेना शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे बागेवाडी ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे, काँग्रेस चे शहर अध्यक्ष नवनाथ (भाऊ)साठे लक्ष्मण तात्या डोईफोडे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.







