*उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आ.रणजितदादांनी फोन केला अन् तालुक्यात लाईट आली ; आ.सातपुते*
अकलूज : थकीत वीज बिला पोटी अनेक तालुक्यातील शेती पंपाचा विज पुरवठा बंद करण्याच्या सूचना वरीष्ठ स्तरावरून आल्यानंतर माळशिरस तालुक्यातील विज पुरवठाही अचानक बंद करण्यात आला. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून विज पुरवठा सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ माळशिरस तालुक्यातील विज पुरवठा सुरू करण्याच्या सुचना दिल्या व माळशिरस तालुक्याचा विज पुरवठा सुरू झाला. आ. राम सातपुते यांनी सांगितलेल्या या रहस्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून आ. रणजितसिंहांचे आभार मानले.माळशिरस तालुक्यातील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतीपंपाची विज तोडण्याच्या पार्श्वभूमीवर आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न बंगला येथे अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी यावेळी आ. राम सातपुते, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, दत्तात्रय भिलारे, प्रकाश पाटील, रावसाहेबर पराडे, प्रतापराव पाटील, नितीनराजे निंबाळकर, नाना मुंडफणे, अर्जुनराव भगत, ताटे देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय ओमासे, प्रविण कुंभार, किरण डोईफोडे, उपव्यवस्थापक प्रदिप सुरवसे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.












