• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्याने टणूकरांचा जिव पडला भांड्यात, प्रशासनाने सोडला सुटकेचा सुस्कारा. पुणे ग्रामीण व शहर बाॅम्ब शोध पथकाची संयुक्तिक कारवाईत ती वस्तू स्फोट करून नष्ट केली

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 14, 2023
in आपला जिल्हा
0
बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्याने टणूकरांचा जिव पडला भांड्यात,                                                     प्रशासनाने सोडला सुटकेचा सुस्कारा.                          पुणे ग्रामीण व शहर बाॅम्ब शोध पथकाची संयुक्तिक  कारवाईत ती वस्तू स्फोट करून नष्ट केली
0
SHARES
245
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बॉम्बसदृश्य वस्तू निकामी केल्याने टणूकरांचा जिव पडला भांड्यात, प्रशासनाने सोडला सुटकेचा सुस्कारा. पुणे ग्रामीण व शहर बाॅम्ब शोध पथकाची संयुक्तिक कारवाईत ती वस्तू स्फोट करून नष्ट केली

इंदापूर, प्रतिनिधी, एस. बी. तांबोळी

निरा आणि भिमा नदिच्या खोऱ्यातील टणू ( ता. इंदापूर ) गावात बॉम्बसदृश्य वस्तूने दोन दिवस एकच खळबळ माजवली. अखेर पोलिसांसह बॉंबशोध पथकाने स्फोट घडवत या वस्तुचा नाश केल्याने टणू गावासह परिसरातील नागरिकांनी व दोन दिवस चिंतेत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.

सोमवारी १३ फेब्रुवारीला टणु येथील शेतकरी दत्तात्रय तुळशीराम मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हि वस्तू निदर्शनास आल्या नंतर मोहिते यांनी तात्काळ इंदापूर पोलिसांना कल्पना दिली होती. पोलिसांनी घटनस्थळी तातडीने धाव घेतली. इंदापूर पोलिसांनी पुणे ग्रामीणचे बीडीडीएस पथकाशी संपर्क करून पथकाला पाचारण केले. संध्याकाळी पथक टणू गावात दाखल झाले होते. दरम्यान श्वान पथकाने देखील या वस्तूला बॉम्ब असल्याचा संकेत दिल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. त्यानंतर संपूर्ण तपास करून पुणे शहर आणि ग्रामीण बीडीडीएस च्या पथकाच्या मदतीने ती संशयास्पद वस्तू मंगळवार दि. १४ रोजी दुपारी ३ वाजून ०५ मिनिटांनी स्फोट करून निकामी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला लोकांनी देखील या कार्यवाहीत प्रशासनाने दाखवलेल्या तत्परते मुळे समाधान व्यक्त केले.

दरम्यान बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी सोमनाथ लांडे, पोलीस आरिफ चाँदसाहेब सय्यद, विकास राखुंडे, सुरेंद्र वाघ, हवालदार विरभद्र मोहळे, सचिन बोराडे, राकेश फाळके, समाधान केसकर, विनोद काळे, शुभांगी खंडागळे आदींजण घटनास्थळी तळ ठोकून होते.

*पोलिसांसमोर तपासाचे आव्हान*

जरी ही बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी केली असली तरी या ठिकाणी ती आली कशी? या पाठीमागील उद्देश काय? आणि तो कोणी आणला? यासारखे अनेक प्रश्न आता पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहेत. त्याची उत्तरेही पोलीस यंत्रणेला मिळवावी लागणार आहेत.

“चौकट :-

तपासणीसाठी अवशेष प्रयोग शाळेत पाठविणार .. शेतकरी दत्तात्रय मोहिते यांच्या शेतात बॉम्बसदृश्य वस्तू संशयास्पद असल्याने पुणे ग्रामीणच्या बाॅम्ब शोधक पथकाला बोलविले. पथकाने त्याची पाहणी केल्यानंतर ते स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले. त्यास सुरक्षित स्थळी नेऊन त्याचा स्फोट घडवत ते नष्ट केले. स्फोटानंतर त्याचे जे अवशेष आहेत ते ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

दिलीप पवार – पोलीस निरीक्षक इंदापूर

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज येथील ताराराणी कुस्ती केंद्रला राज्यस्तरीय स्पर्धेत ४ पदके

अकलूज येथील ताराराणी कुस्ती केंद्रला राज्यस्तरीय स्पर्धेत ४ पदके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In