• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपला जिल्हा

बेकायदेशीरपणे वारसनोंद लावणाऱ्या माण तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक वर कारवाई करावी -ज्ञानदेव अहिवळे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 11, 2023
in आपला जिल्हा
0
बेकायदेशीरपणे वारसनोंद लावणाऱ्या माण तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक वर कारवाई करावी -ज्ञानदेव अहिवळे
0
SHARES
300
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बेकायदेशीरपणे वारसनोंद लावणाऱ्या माण तालुक्यातील तत्कालीन ग्रामसेवक वर कारवाई करावी -ज्ञानदेव अहिवळे अकलूज (प्रतिनिधी )माण(दहिवडी )तालुक्यातील इंजबाव येथील रहिवाशी कै. महादेव राऊ अहिवळे यांच्या मालकीचे पत्र्याचे घर आणि मोकळी जागा अशी सुमारे साडे पाच गुंठे जागा मौजे इंजबाव हद्दीत आहे.यातील मूळ वारस महादेव अहिवळे यांचे 27-7-2004रोजी निधन झाले.त्यानंतर त्यांचे पश्चात पत्नी द्रौपदा महादेव अहिवळे, मुले -तुकाराम, ज्ञानदेव, भागवत, राजाराम, तर मुली -बकुळा, रुक्मिणी, भामाबाई असे वारस आहेत. परंतु आठ वारस असताना वडिलांचे मृत्यूपत्र देखील नसताना तुकाराम अहिवळे यांनी तत्कालीन ग्रामसेवक यांचे बरोबर आर्थिक देवाण -घेवाण करून केवळ स्वतःची वारस म्हणून मिळकती वर नोंद लावली. त्यानंतर 15-6-2013रोजी तुकाराम यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पश्चात तुकाराम यांची मुले शंभुदेव, शिवाजी आणि तुकाराम अहिवळे यांची पत्नी गंधारी यांची नावे वारस म्हणून लावण्यात आली.त्यानंतर 2022 मध्ये अकलूज येथे रहिवाशी असलेले ज्ञानदेव अहिवळे व राजाराम अहिवळे हे काही कामानिमित्त इंजबाव येथे गेले असता सदर मिळकत ही शंभुदेव व शिवाजी यांनी इंजबाव येथील गणेश ज्ञानदेव साळुंखे यांना मोकळी जागा असलेली मिळकत विकली.असे समजले.वास्तविक पाहता, शंभुदेव आणि शिवाजी यांनी गणेश साळुंखे यांचेकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. त्याची मुदतीत परतफेड न झाल्याने त्यांनी सदरची जागा साळुंखे यांना विकली.त्यानंतर अकलूज येथील ज्ञानदेव अहिवळे, राजाराम अहिवळे, शुभम अहिवळे यांनी 24-1-2023रोजी इंजबाव येथील ग्रामसेवक यांना यासंदर्भात तक्रारी अर्ज दिला आहे.या अर्जात असे नमूद करण्यात आले आहे कि, आम्ही सर्वजण कै. महादेव अहिवळे यांचे वारस असताना, तसेच याबाबत कायदेशीर पणे मिळकत वाटप झालेली नसताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या मिळकती मधील काही हिस्सा परस्पर विकण्यात आला आहे. तसेच या जागेवर गणेश साळुंखे यांनी बेकायदेशीर पणे बांधकाम सुरु केले आहे.याची चौकशी होऊन सदर बेकायदेशीर बांधकामास स्थगिती मिळावी. अशी विनंती करण्यात आली आहे.तसेच यासंदर्भात म्हसवड येथील वकील डी. एल. हांगे यांचे मार्फत इंजबाव येथील ग्रामसेवक यांचेकडे हरकती संदर्भात नोटीस पाठविण्यात आली आहे.सदर नोटीशीत असे नमूद करण्यात आले आहे कि,अशिल ज्ञानदेव महादेव अहिवळे पो. इंजबाव, ता. माण जि. सातारा सध्या रा. संग्राम नगर, नऊचारी, अकलुज, ता. माळशिरस, जि. सोलापुर यांनी दिलेल्या लेखी आणि तोंडी माहिती व अधिकारावरून तसेच दाखविलेले कागदपत्रावरून या नोटिसीनेविनंती करण्यात आली आहे. इंजबाव ग्रामपंचायत कार्यालयातील कै. महादेव अहिवळे यांचे नावे असलेला ग्रामपंचायत मिळकत नंबर 110, तसेच सध्याचा असणारा नं,117 यामध्ये कै. तुकाराम यांचे वारस शंभुदेव व शिवाजी यांचे नावे असणारा अर्जदार व गैरअर्जदार शंभुदेव तुकाराम अहिवळे व शिवाजी तुकाराम अहिवळे यांची एकत्र कुटुंबाची वडिलार्जीत सदरची मिळकत असुन, सदर जागेत बेकायदेशीरपणे शंभुदेव तुकाराम अहिवळे व शिवाजी तुकाराम अहिवळे हे सदर जागेची विक्री झाली असे म्हणुन याच गावातील गणेश ज्ञानदेव साळुंखे यांना अनाधिकाराने नवीन घर बांधकाम करण्यासाठी खोद काम करण्यास मदत करत आहेत. सदर अर्जदार यांचे मुळ कुटुंबातील जागेत शासनाच्या योजनेचा शिवाजी तुकाराम अहिवळे यांनी जनावरांच्या गोठयाचा मोफत योजनेचा फायदा घेतलेला होता. त्यासाठी मिळालेल्या शासनाची जमिन बेकायदेशीरपणे विक्री करून शासनाची फसवणुक केलेली आहे.याबाबत योग्य ती फौजदारी कारवाई करणे योग्य होणार आहे.अशा परिस्थितीत त्यांनी बेकायदेशीर बांधकाम करू नये व अर्जदार यांचे कायदेशीर मालकी हक्कावर बाधा आणु नये.तसेच सदर बाबत स्थानिक स्वराज्य संस्था यांचे शासनाचे अधिकारी म्हणुन आपणास सदरची बेकायदेशीर कृत्य थांबवण्यास सदर नोटिसीने कळविणे भाग पडत आहे. सबब या नोटिसीने तुम्हास कळविण्यात येते की, सदर जागेत होत असलेले बेकायदेशीर काम थांबविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे यासंदर्भात अकलूज येथील ज्ञानदेव अहिवळे यांनी म्हसवड पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक यांचेकडे देखील तक्रारी अर्ज दिला असून, ग्रामपंचायत ने संबधीत व्यक्तीला बांधकाम थांबविण्या संदर्भात नोटीस देऊन सुद्धा अद्याप बांधकाम थांबविले नाही. त्यामुळे हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे. असा तक्रारी अर्ज म्हसवड पोलीस ठाणे येथे देण्यात आला आहे.

चौकट :-

दरम्यान यासंदर्भात बोलताना तक्रारदार ज्ञानदेव अहिवळे यांनी सांगितले कि, कै. महादेव अहिवळे यांचे इतर वारस जिवंत असताना देखील केवळ स्वार्थासाठी तत्कालीन ग्रामसेवक यांचेशी आर्थिक देवाण -घेवाण करून बेकायदेशीर वारस नोंद लावणारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी,ग्रामसेवक,यांचेवर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा कायदेशीर मार्गाने दाद मागणार.

अहिवळे कुटुंब.अकलूज

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

DCC बँक निवडणूक :                                                  पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा!                                                                      रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात;                                    प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा
आपला जिल्हा

DCC बँक निवडणूक : पंढरपुरात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा! रणजितसिंह मोहिते-पाटील मैदानात; प्रशांत परिचारक यांच्याशी अर्धा तास चर्चा

October 27, 2026
ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड                बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव
आपला जिल्हा

ह. भ. प. प्रवीण महाराज मिटकल यांची निरपेक्ष कीर्तन सेवा संस्थेच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी निवड बाभुळगावच्या प्रवीण महाराजांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव

October 13, 2026
सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ   कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन
आपला जिल्हा

सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ कोळेगावातून ऊस वाहतूक करणाऱ्या पहिल्या पाच ट्रॅक्टरचे सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन

October 13, 2026
मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.                       डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान
आपला जिल्हा

मळोलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. डॉ. गायत्री क्षीरसागर यांचा रणजितसिंह जाधव यांचे हस्ते सन्मान

October 7, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा शुभारंभ                                                       विजयसिंह मोहिते पाटील व नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन, काटा पूजन व गळीत हंगामास प्रारंभ

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 
आपला जिल्हा

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न 

August 16, 2026
Next Post
अकलूज येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी.

अकलूज येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In