*अकलूज येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी.*
संग्रामनगर दि.११ (केदार लोहकरे यांजकडून) अकलूज येथील काझी गल्लीतील मोदी निवास येथे भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा व भारतीय जनता पक्ष अकलूज शहर यांच्या वतीने आज प्रेरणा स्त्रोत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबू यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अकलूज शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव कावळे, लक्ष्मण सदाफुले,सुहास गायकवाड,विकी गायकवाड,अजिम कोरबू,निहाल कोरबू व सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.






