*मोहिते महाविद्यालयात शंकरराव मोहिते पाटील यांची पुण्यतिथी साजरी*
संग्रामनगर दि.११ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात आज सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या ४४ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा.दत्तात्रय मगर हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला सहकार महर्षी यांना ६१ वर्ष आयुष्य लाभले पण या मिळालेल्या आयुष्यात त्यांनी अनेक प्रकारचे संघर्ष करीत माळशिरस तालुक्यात हरितक्रांती,श्वेत क्रांती, अर्थकारण,समाजकारण, राजकारण,कला,क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात क्रांती केली असल्याचे सांगितले.सहकार महर्षी हे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणारा एक जिज्ञासू लढवय्या म्हणून त्यांचा उल्लेख केला.आज आपण या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे पालन केले तर आपण जीवनात यशस्वी होऊ असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय बागडे यांनी शंकरराव मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यात विकासाची गंगा आणली म्हणून आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असल्याचे दिसून येत आहे असे मत मांडले. यासाठी सर्वांनी त्यांचे आचार विचार अंमलात आणावेत व त्यांचा वारसा आपण सर्वजण पुढे नेऊया असे सांगितले. या कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.हनुमंतराव आवताडे,ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.राजकुमार इंगोले कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका,महाविद्यालयाचे प्रबंधक युवराज मालुसरे शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सी.बी.लोंढे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.जनार्धन परकाळे यांनी केले.







