• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Saturday, July 11, 2026
संघर्ष योद्धा
No Result
View All Result
  • Login
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home देश-विदेश

आमदार श्रीकांत भारतीय यांची आगामी निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर भाजपा महाविजय 2024साठी प्रदेश संयोजक पदी नियुक्ती

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 11, 2023
in देश-विदेश, राजकारण
0
आमदार श्रीकांत भारतीय यांची आगामी निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर भाजपा महाविजय 2024साठी प्रदेश संयोजक पदी नियुक्ती
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार श्रीकांत भारतीय यांची आगामी निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर भाजपा महाविजय 2024साठी प्रदेश संयोजक पदी नियुक्ती

अकलूज (प्रतिनिधी )भाजपा ने आगामी निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर *महाविजय 2024*असा महत्वकांक्षी संकल्प केला असून, विधानपरिषद चे आमदार श्रीकांत भारतीय यांची प्रदेश संयोजक म्हणून महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद चे आमदार व भाजपा चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.आ. श्रीकांत भारतीय यांनी आजपर्यंत पक्ष वाढीसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पक्षाची पकड राज्यातील ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी व्यूहनीती तयार करण्यात आली. यात श्रीकांत भारतीय यांची महत्त्वाची भूमिका होती.विधान परिषदेसाठी भाजपमध्ये अनेक दिग्गज स्पर्धेत असताना मूळचे अमरावतीकर श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली . भाजपच्या प्रदेश पातळीवरील राजकारणात आजवर पडद्याआड राहून काम करणाऱ्या भारतीय यांना त्यांच्या पक्षसंघटनात्मक बांधणीतील योगदानाचे बक्षीस मिळाले आहे. अभाविप कार्यकर्ता ते भाजपचे पडद्यामागील रणनीतीकार आणि आता विधान परिषदेतील आमदार असा श्रीकांत भारतीय यांचा प्रवास झाला असून पश्चिम विदर्भातील भाजप पक्षसंघटन बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.नागपूर आणि त्यानंतर मुंबई हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातील मूळ रहिवासी असले, तरी त्यांचा अधिक वावर हा प्रदेश पातळीवरील राजकारणात राहिला आहे. एक अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. परतवाडा येथे शेतकरी, शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांत भारतीय यांनी शेतकरी संघटनेत काम करताना शेतकरी आंदोलनातही सहभाग घेतला होता. प्राध्यापक, पत्रकार म्हणून त्यांनी काम केले.१९८५ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, विदर्भाचे प्रदेश संघटनमंत्री, आसाममधल्या बोडो अल्फा चळवळींवर अभ्यासक म्हणून काम, १९९४ पासून पूर्णवेळ भाजपचे कार्यकर्ते, नागपूर शहर संघटन मंत्री, नागपूर विभाग संघटन मंत्री, २००० ते २००६ युवा मोर्चा प्रदेश संघटन मंत्री, पुणे विभाग संघटन मंत्री, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘वॉर रूम’चे प्रमुख, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती समन्वयक’, २०१५ ते २०१९ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी, २०२० पासून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अशी श्रीकांत भारतीय यांची कारकीर्द आहे.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पक्षाची पकड राज्यातील ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी व्यूहनीती तयार करण्यात आली. यात श्रीकांत भारतीय यांची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगितले गेले. राज्यातील नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही त्यांचे चांगले संबंध राहिले आहेत.विधानपरिषद चे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा चे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील तसेच माळशिरस विधानसभा चे आमदार राम सातपुते यांचेबरोबर देखील त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. अनेक भागात कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत जवळीक वाढवली. त्यांच्या या कामाचा आणि अनुभवाचा पक्षाला निश्चितपणे फायदा होणार आहे.त्यांची प्रदेश संयोजक म्हणून निवड झाल्यामुळे आगामी निवडणुकीत रणनीती ठरविण्यासाठी त्यांच्या पदाचा उपयोग होणार आहे.दरम्यान या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Related Posts

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन                            लोकसंख्या आणि
देश-विदेश

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि

July 11, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील
राजकारण

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गावाला विकास निधीत समान न्याय मिळावा – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

June 15, 2026
सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष
राजकारण

सोलापूर विधानपरिषद : आकड्यांच्या पलीकडचा संघर्ष

June 14, 2026
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश*  *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन;               केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*
राजकारण

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश* *टेंभुर्णी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग होणार फोर लेन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा*

May 15, 2026
लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील*                                                                         ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा
राजकारण

लोकनेतृत्वाचा ध्यास: खासदार धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील* ॥*वारसा कर्तृत्वाचा, विश्वास जनसेवेचा

April 13, 2026
धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं…                   .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.
आपला जिल्हा

धाराशिव लोकसभा नवनियुक्त संपर्क प्रमुख दिल्लीतील श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी राजकीय खलबतं… .प्रवक्ते योगेश केदार यांनी नव्या जबाबदारी बद्दल माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सन्मान केला.

April 3, 2026
Next Post
मालन भानुदास मुंगूसकर यांचे निधन                        ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर यांना मातृशोक

मालन भानुदास मुंगूसकर यांचे निधन ग्रामसेवक सुधाकर मुंगुसकर यांना मातृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
  • खळवे परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • ११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन लोकसंख्या आणि
  • अकलूजमध्ये रंगणार शिवराज्याभिषेकाचा वैभवशाली इतिहास; ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या भव्य म्युझिकल नाट्यप्रयोगाची रसिकांना पर्वणी
  • *माळशिरस तालुक्यातील सुप्रसिद्ध पैलवान किरण शिवाजी फुके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
  • सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा विळखा? अनेक तालुक्यांत संशयित वैद्यकीय व्यवसाय; प्रशासनाच्या कारवाईची मागणी

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!