• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home क्रीडा

दुर्लक्षित राहिलेले सिनेअभिनेते,जुन्या काळातील भारदस्त पैलवान श्री.विलास रकटे-पैलवान संग्राम कांबळे

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 9, 2023
in क्रीडा
0
दुर्लक्षित राहिलेले सिनेअभिनेते,जुन्या काळातील भारदस्त पैलवान श्री.विलास रकटे-पैलवान संग्राम कांबळे
0
SHARES
137
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*दुर्लक्षित राहिलेले सिनेअभिनेते,जुन्या काळातील भारदस्त पैलवान श्री.विलास रकटे*

ज्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ तसेच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातला सुवर्णकाळ असे दोन्ही सुवर्णकाळ आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाने गाजवून सोडलेले असे मराठी चित्रपट सृष्टीतील दमदार व्यक्तिमत्त्व निर्माता, दिग्दर्शक, ज्येष्ठ सिनेअभिनेते, दिग्गज पैलवान असे अष्टपैलू व्यक्ति असलेले श्री.विलासजी रकटे साहेब यांना त्यांच्या घरी भेटण्याचा काल योग आला.मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता व खलनायकाची त्यांनी भूमिका साकारली आहे, त्यांचे वय वर्ष 85 आहे , तसेच ते अनेक ऐतिहासिक कुस्त्याचे ते साक्षीदार राहिलेले आहेत, जुन्या काळातील अनेक दिग्गज लोकांच्या, पैलवानांच्या, कलाकारांच्या आठवणी त्यांना मुखोद्गत आहेत. महान पैलवान दारासिंग यांच्याशी त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध होते.एक एक दुर्मिळ आठवण ऐकताना अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले.कोल्हापूरातील ऐतिहासिक खासबाग मैदानामध्ये त्यांच्या अनेक कुस्त्या झालेल्या आहेत,नगरमध्ये हिंदकेसरी मारुती माने यांच्या सोबत झालेली कुस्ती त्यांनी आवर्जून सांगितली,तसेच दुसरे महाराष्ट्र केसरी भगवानराव मोरे यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आठवण तसेच विशेष म्हणजे खासबाग मैदानामध्ये ज्यावेळी कुस्ती असेल त्यावेळी कुस्ती मारल्यानंतर आंघोळ करून ते बाजूलाच असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग करत असे.आज पर्यंतच्या इतिहासामध्ये खासबाग मध्ये कुस्ती खेळून पुन्हा केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये नाटक सादर करणारा देशातील एकमेव पैलवान कोण असेल तर ते श्री.विलास रकटे साहेब होय.लहानपणापासून अभिनयाची आवड तसेच क्रांतिकारकांचा जिल्ह्यामधून त्यांच्यावर झालेले संस्कार यामुळे ते अधिक कणखर बनत गेले.आपल्या जिवंत अभिनयाने अनेक प्रेक्षकांचे तसेच कुस्तीने अनेक कुस्ती शौकिनाचे ते चाहते बनले, अनेक ऐतिहासिक गोष्टींची ते साक्षीदार राहिलेले आहेत.या वयात सुद्धा त्यांचा जोश व उत्साह काम करण्याची आवड ,जिद्द ही युवा तरुणांना लाजवेल अशीच आहे.त्यांची महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ,प्रतिसरकार मधील क्रांतिसिंह नाना पाटील व अन्य क्रांतिकारक सहकारी यांच्यावर आधारित *क्रांतीपर्व* या नावाने मराठी चित्रपट निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प आहे, त्या चित्रपटाची पटकथा गेली अनेक वर्षे तयार आहे तसेच यामध्ये सर्व घटना या सत्य घटनेवर आधारित आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे जुने लोककलावंत म्हणून अवघे 2500 महिना पेन्शन मिळते,ती सुद्धा त्यांना वेळेवर मिळत नाही. या तुट पुंज्या पेन्शनवर सध्याच्या काळात काहीच होत नाही अशी त्यांनी खंत बोलून दाखवली.या वयात वैद्यकीय उपचारासाठी, तसेच घरातील अन्य गोष्टींसाठी शासनाने व दानशूर व्यक्तींनी मदत करावी अशी त्यांच्या घरातील व्यक्तींनी मागणी केलेली आहे.त्यानंतर आम्ही कामेरी गावचे विद्यमान सरपंच श्री.रणजीत पाटील साहेब यांची ग्रामपंचायत मध्ये भेट घेऊन त्यांच्यातर्फे सुद्धा श्री.विलास रकटे हे कामेरीं गावचे भूषण आहेत त्यांचा पूर्ण सांभाळ हा गावातर्फे करणे गरजेचे आहे ,हा मुद्दा त्यांना सांगितला त्यांनी सुद्धा सहमती दर्शवत मदत करण्याचे आश्वासन दिलेल आहे.अशा या दिग्गज कलाकारावर ,पैलवानावर आज खूप हलकीची परिस्थिती ओढवली आहे.अशा सुवर्णकाळ अनुभवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याला, पैलवानाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करणार आहोत.या अविस्मरणीय भेटीमध्ये माझ्या समवेत वस्ताद बाबाराजे महाडिक, वस्ताद जयवंत पाटील, श्री.शामराव जाधव सर, श्री.अमित गायकवाड, श्री.झुंजार रकटे, श्री. मुजावर साहेब इत्यादी उपस्थित होतो. यावेळी वस्ताद जयवंत पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते विलासजी रकटे साहेब यांना पुस्तक तसेच इंस्टंट थंडाई भेट देण्यात आले.

धन्यवाद..🙏💐पैलवान संग्राम कांबळे.✒️✨

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ
क्रीडा

रोहतकच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी अनुष्का हास्पेची महाराष्ट्र संघात निवड; ग्रामीण कन्येच्या जिद्दीला यशाचे बळ

June 27, 2026
सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!*   *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त*                              -*पैलवान संग्राम कांबळे.*
क्रीडा

सोलापूर राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद!* *सोलापूर जिल्ह्यातील वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून समाधान व्यक्त* -*पैलवान संग्राम कांबळे.*

April 27, 2026
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन
क्रीडा

जागतिक आरोग्य दिनानिमित्त ५ एप्रिल रोजी“सन डे, वन डे” माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन

March 9, 2026
टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते
क्रीडा

टी-20 विश्वचषक 2026 : फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, तिसऱ्यांदा विश्वविजेते

March 8, 2026
क्रीडा

अकलूजमध्ये टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपणरविवारी सायंकाळी ५ वाजता विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात भारत-न्यूझीलंड लढतीचा थरार

March 7, 2026
विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*
क्रीडा

विरविजय संघाने पटकावला छत्रपती चषक*

March 2, 2026
Next Post
काझी गल्ली, शनि मंदिर परिसरातील नागरिकांनी अकलूज नगरपरिषेदला दिला अंदोलनचा इशारा*

काझी गल्ली, शनि मंदिर परिसरातील नागरिकांनी अकलूज नगरपरिषेदला दिला अंदोलनचा इशारा*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In