*काझी गल्ली, शनि मंदिर परिसरातील नागरिकांनी अकलूज नगरपरिषेदला दिला अंदोलनचा इशारा*
अकलूज येथिल काझी गल्ली, शनि मंदिर येथे सुरु असणारे सार्वजनिक शौचालय काम जलद गतीने करण्यात यावे. असे निवेदन या परिसरातील नागरिकांनी अकलूज नगरपरिषेदला दिले आहे. या काझी गल्ली, शनि मंदिर परिसरात असणारे जुने सार्वजनिक शौचालय पाडल्यामुळे येथिल नागरीकांना निरा नदी काढावरती शौचास जावे लागत आहे. अतिशय अडचणी निर्माण होऊन येथिल नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. पर्यायी शौचालय नसल्यामुळे या परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या परिसरात शिवासुष्टी किल्ला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक पर्यटक या किल्ल्यास भेट देण्यासाठी येत असतात. तसेच शैक्षणिक सहली भेट देत असतात. त्यामुळे हे सार्वजनिक शौचालय त्या परिसरातील नागरिकांना वापर करण्यासाठी जलद गतीने बाधण्यात यावे. उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांन मुळे येथिल शिवसुष्टी नदीकाट परिसरात दुर्गंधी वाढू लागलेली आहे. नगरपरिषेद मार्फत माझी वंसुंधरा अभियान चालू असताना अशा प्रकारे दुर्गंधीचे साम्राज्य तयार होत आहे. तरी या शौचालय बाबत आम्ही वारंवार आपणास भेटून कळवले आहे. आम्हा नागरिकांची गैर सोय दुर करवी. आन्यथा आपल्या अकलूज नगरपरिषेद अकलूज च्या विरोधात तिव्र असे अंदोलन करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे निवेदन धनगर समाजाचे नेते मा.श्री. संजय पाडोळे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अकलूज शहर उपअध्यक्ष मा. श्री. राजेश गायकवाड , भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अकलूज शहर सरचिटणिस मा. श्री मेघराज देशमुख, व मा. श्री. नवनाथ माने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अकलूज शहर सदस्य यांनी अकलूज नगरपरिषेद बांधकाम विभाग प्रमुख व अरोग्य विभागाला देण्यात आले आहे.






