*अकलूज येथे शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा संपन्न*पुणे विभागचे वर्चस्व
अकलूज / प्रतिनीधी ; क्रीडा व सेवा युवक संचालन महाराष्ट्राची पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने १७ वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा २०२२-२०२३ अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडली या मध्ये राज्यातील ९ विभाग सहभागी झाले होते. स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण स्वरुपाराणी मोहिते पाटील, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष भारत शिंदे, क्रीडा अधिकारी नितीन तारळकर,जिल्हा सचिव हरिदास रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.१)कंपाऊंड राऊंड प्रकारच्या स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे *मुले ओव्हरऑल निकाल*ओम सूर्यकांत कांबळे ,पुणे प्रथम क्रमांक अथर्व लक्ष्मण कांबळे कोल्हापूर द्वितीयकपिल दत्ता सातघरे मुंबई तृतीयटीम प्रथम -पुणे ,द्वितीय-कोल्हापूर, टीम तृतीय-मुबंई *मुली ओव्हर ऑल निकाल*आर्या अतुल प्रसाद पुणे प्रथमऋतुजा परमेश्वर कसाळ पुणे द्वितीयअनुष्का रमेश मदने पुणे तृतीयटीम – प्रथम -पुणे ,द्वितीय-औरंगाबाद, तृतीय-नागपूर२)इंडीयन राऊंड प्रकारच्या स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे *मुले ओव्हर ऑल निकाल*आदित्य अनंता चव्हाण, पुणे प्रथम क्रमांक स्वराज राजेंद्र जंगम, कोल्हापूर द्वितीय क्रमांक अनिकेत महेंद्र गावडे ,कोल्हापूर, तृतीय क्रमांक टिम – कोल्हापूर- प्रथम क्रमांक, पुणे – द्वितीय क्रमांक , नाशिक- तृतीय क्रमांक *मुली ओव्हर ऑल निकाल*ऋतुजा विनायक पवार – नाशिक, प्रथम क्रमांक समृद्धी शिवप्रसाद पवार – पुणे ,द्वितीय क्रमांक संचिता शिवाजी नाईक – कोल्हापूर, तृतीय क्रमांकटिम पुणे – प्रथम क्रमांक, कोल्हापूर- द्वितीय क्रमांक, नागपूर- तृतीय क्रमांक३)रिकर्व्ह राऊंड प्रकारच्या स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे*मुले ओव्हर ऑल निकाल*यश मनोज उगले – अमरावती , प्रथम क्रमांक सोहम शरद कणसे – पुणे , द्वितीय क्रमांक अथर्व हनुमंत कदम – पुणे , तृतीय क्रमांक टिम अमरावती – प्रथम क्रमांक ,पुणे – द्वितीय क्रमांक, कोल्हापूर- तृतीय क्रमांक *मुली ओव्हर ऑल निकाल*वैष्णवी बाबर पवार -पुणे, प्रथम क्रमांक सिद्धी सुरेश साळुंखे – पुणे , द्वितीय क्रमांक सायमा महेमुद शेख – पुणे ,तृतीय क्रमांक टिम – प्रथम क्रमांक- पुणे , द्वितीय क्रमांक – कोल्हापूर तृतीय क्रमांक – नागपूर या वेळेस भारत शिंदे,हरिदास रणदिवे,डाॅ.विश्वनाथ आवड ,धर्मराज दगडे,सुप्रिया किरनाळे, सोनल बुंदीले,क्रीडा अधिकारी तानाजी मोरे, सुप्रिया गाढवे,श्री. धारूरकर , भैरावनाथ नायकुडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
*चौकट*
ग्रामीण भागातील मुलांमध्ये देखील गुणवत्ता सिद्ध करण्याची क्षमता असते त्यांना फक्त गुणवत्तापूर्ण योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणाची गरज असते,हे लक्षात घेता त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ व सोलापूर जिल्ह्य़ातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील धनुर्विद्येचे खेळाडू घडवू
धैर्यशिल मोहिते-पाटील,अध्यक्ष, सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना







