*कॉलेज जीवनाचा युवकांनी मनसोक्तपणे आनंद घ्या.जयसिंह मोहिते पाटील.*
संग्रामनगर दि.८ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय कँडेट कोअर,जिमखाना विभाग आणि सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सन २०२२ ते २०२३ या वर्षभरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला त्या 75 विदयार्थ्यांचा याप्रसंगी प्रमाणपत्र व ट्रॉफी देवुन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले कि,प्रत्येक व्यक्तीकडे कोणती तरी कला असायला हवी ती आपणास जगण्याची उर्जा निर्माण करून देते.केवळ महाविद्यालय शिकत बसू नका तर कॉलेज जीवनात स्वतःचे छंद जोपासत आनंदी जगण्याचा प्रयत्न करा,कारण हे जीवन पुन्हा मिळत नाही.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सर्वच क्षेत्रात पांरगत होण्यासाठी प्रयत्न करून स्वताचे व्यक्तीमत्व घडवावे असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.आपल्या महाविद्यालयीन जीवनातले अनेक प्रसंग विदयार्थ्यांना त्यांनी रंजक पध्दतीने सांगितले नवनवीन शिकत रहा,पारंपरीक शिक्षणाबरोबरच स्वत:ला घडवायला शिका,हजरजबाबीपणा अंगिकारा,पुस्तके वाचा,ग्रंथालयाची माहीती घ्या, विविध प्रकारचे खेळ खेळा जास्तीत जास्त ट्रेस फ्रि राहण्याचा प्रयत्न करा असेही अवाहन त्यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचे व महाविदयालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे आणि संचालिका कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने चौफेर यश मिळविले आहे याबाबतचा अहवाल आपल्या मनोगतामध्ये सादर केला. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महाविद्यालय विकास समितीचे सदस्य राजाभाऊ लव्हाळे,मनोज रेळेकर,प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे,प्रा.हणमंत आवताडे उपस्थित होते. या कार्यक्रमात गुणवंत विदयार्थी सन्मान क्रिडा यादीचे वाचन प्रा.अरविंद वाघमोडे,सांस्कृतिक विभाग यादीचे वाचन डॉ.विश्वनाथ आवड,एन.सी.सी.विभाग यादीचे वाचन प्रा.नंदकुमार गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.दत्तात्रय बारबोले यांनी केले तर आभार प्रा.अनिल पराडे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सिनीयर व ज्युनियर विभागातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी ऑफिस अधिक्षक युवराज मालुसरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी प्ररिश्रम घेतले.















