*सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे माळशिरस तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे सरकार व खाजगी रुग्णालयातील रुग्णाहक्काची सनद दर्शनी भागावरती लावण्याची केली मागणी*
सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ अकलुज शहर व माळशिरस तालुक्याच्या वतीने (दचार्ट ऑफ पेशंट राईट ) ही सनद मानवी हक्क आयोग भारत सरकारने दिनंक 13 जानेवारी 2020 रोजी त्यांच्या वेबसाईट वरती प्रसारित केलेली आहे. ही सनद जशीच्या तशी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारने स्वीकारलेली आहे सदर सनद सर्वच राज्य सरकारला पाठवण्यात आलेले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या आरोग्य विभागामार्फत सर्व हॉस्पिटलमध्ये लागू करावे आसे केंद्र सरकारने म्हटलं आहे. आपल्या माळशिरस तालुक्यातील व जिल्ह्यातील बहुतांश हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या हक्काचे सनद दर्शनी भागात लावलेले नाहीत. तरी लवकरात लवकर सर्व हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावेत कोणत्याही रुग्णांनास त्याच्या हक्काची जाणीव करून देणारा हा कायदा व माहिती मिळवण्याचा हक्क तपासणी अपेक्षित खर्च व रुग्णाच्या नोंदी. केस पेपर तपासणी अहवाल सविस्तर बिले मिळण्याचा हक्क मिळाला पाहिजे. त्या अनुषंगाने हे सर्व बाबींचा विचारात घेता सदरील रुग्णहक्काचे सनद दर्शनी भागात हॉस्पिटलमध्ये लावण्यात यावे हे निवेदन श्री अजित तुकाराम जाधव , मंडल अधिकारी कार्यालय , अव्वल कारकुन माळशिरस यांनी स्वीकारले ही मागणी राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ अकलुज शहर व माळशिरस तालुका टीमच्या वतीने देण्यात आले यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने पुणे जिल्हा महिला अध्यक्ष शुभांगी मोरे माळशिरस तालुका महिला अध्यक्ष शोभा दळवी माळशिरस तालुका महिला उपाध्यक्ष अश्विनी पांढरे माळशिरस तालुका महिला सरचिटणीस वंदना तिकुटे अकलूज शहर अध्यक्ष समर कोथमीरे अकलूज शहर उपध्यक्ष अभिषेक चाबुकस्वार संग्राम नगर विभाग अध्यक्ष रोहित टेके उपस्थित होते







