*शिवरत्न पॅटर्नच्या वतीने दि.११ रोजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*
प्रतिनीधी; अकलूज शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलीत शिवरत्न पॅटर्न, अकलूज च्या वतीने दहावी व बारावी नंतर करीयरच्या संधी या विषयावर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा करीता शिक्षणतज्ज्ञ सारिका मोहन पाटील यांचे मार्गदर्शन सेमिनारचे शनिवार दि.11/02/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता स्मृतिभवन शंकरनगर अकलूज येथे आयोजन करण्यात आले आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा या निर्णायक वळणावर करिअरच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे यासाठी संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांकरीता करिअरच्या विविध वाटा, व त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता याबाबत सखोल मार्गदर्शन. प्रवेश प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच आपली कागदपत्रे ही कागदपत्रे कोणती असावीत व त्याची वैधता काय असते याबाबत संपूर्ण मार्गदर्शन या सेमीनारमध्ये केले जाणार आहे. Neet/JEE/MHCET परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या अडचणींबाबत सखोल मार्गदर्शन. दहावी व बारावी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा? कोणतं करिअर निवडायचं? असे प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतो. तुमच्याकडे असलेल्या क्षमता, मिळणारे ज्ञान, या क्षेत्रातील आव्हानं तसचं तुमच्या अभ्यासाचा उपयोग हे पाहून करिअर निवडावे. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. हीच मानसिकता हेरून, शिवरत्न पॅटर्न, अकलूज च्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व पालक यांनी खाली दिलेल्या लिंक वर रजिस्ट्रेशन करावे.https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSehpAqpSn9aRo4iWqgMhYmw-tagzRSIUVY01DQuuKbuwKBRwA/viewform?usp=sf_link







