*माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेताना पहायला मिळतात हे आमचे भाग्य आहे.बी.के.मुळे*
संग्रामनगर दि.६ (केदार लोहकरे यांजकडून)अकलूजच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदाशिवराव माने विद्यालयात रंगला 21 वर्षानंतर 10 अ वर्गातील सन २००२ वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा स्नेह संमेलन मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन बी.के.मुळे सर होते तर अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक अंकुश चव्हाण सर होते.तसेच यावेळी माजी मुख्याध्यापक संदिपान पवार सर माजी पर्यवेक्षक अर्जुन चंदनशिवे सर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नंतर उपस्थिती मान्यवरांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यात अंकुश चव्हाण सर यांचा सत्कार शहाजी झंजे,बी.के.मुळे सर यांचा सत्कार विरेन गांधी(फलटणकर),संदिपान पवार सर यांचा सन्मान डॉ.भूषण चंकेश्वरा, अर्जुन चंदनशिवे सर यांचा सन्मान डॉ.संकेत दोशी यांनी केला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते निवृत्ती पर्यंतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपापली मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मार्गदर्शन करताना बी.के.मुळे सर पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी स्वकर्तृत्वावर,स्वतःच्या क्षमतेचा वापर करून विविध क्षेत्रात आपले करिअर करत आपली प्रगती केलेली आहे.यामध्ये काही जण डॉक्टर्स,इंजिनिअर, पी.एस.आय,तर काही जणांनी स्वतःच्या व्यवसायात प्रगती करत जीवनात यशस्वी झाले आहेत. या कार्यक्रमास मंगेश इंगळे,डॉ.चैतन्य टेके,आकाश शिंदे,शिवाजी पवार,प्रितम भांबुरे,राजेश फडे,रविकिरण फडे,किरण कुंभार,तेजस दोशीअमृता भास्करे,अर्चना चंदनकर,प्रणाली ढवळे,चैताली दोभाडा,तन्वी शहा,पूनम ढोबळे, स्वप्नाली बोरावके,अश्विनी चंदनशिवे,वंदना दहिवाळ,सोनाली कथले इत्यादी माजी विद्यार्थी उपस्थित होते.हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सारिका काळे-शिंदे यांनी केले सूत्रसंचालन शहाजी झंजे तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार अजित माने-शेंडगे यांनी मानले.




















