उद्योजक हेमंत टेके यांना पितृशोक
अकलूज येथील उद्योजक सुभाष जगन्नाथ टेके यांचे निधन.
उद्योजक हेमंत टेके यांना पितृशोक
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील कै. सुभाष जगन्नाथ टेके (वय 85वर्षे )यांचे 7फेब्रुवारी रोजी पहाटे 4-30वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अकलूज येथील हेमंत ट्रेडिंग कंपनी चे मालक, उद्योजक, शिवरत्न शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत टेके यांचे ते वडील होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन विवाहित मुली, जावई, नातू, नातसून, परतंवडे असा मोठा परिवार आहे.दरम्यान त्यांचेवर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांचा सावडण्याचा(तिसऱ्याचा )विधी 9फेब्रुवारी रोजी सकाळी येथील अकलाई स्मशानभूमी येथे सकाळी होणार आहे.ते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.






