१ लाख लिटर दुधाच्या बायप्रोडक्टचे उद्दिष्ट; धैर्यशिल मोहिते-पाटील शिवामृत दूध संघाचा द्वितीय पारितोषिक वितरण समारंभमहाबळेश्वर मध्ये मोठ्या उत्साहात पार.
अकलूज/प्रतिनिधी ; कोरोना काळात दुग्ध व्यवसायास मोठ्या प्रमाणात घट झाली होती. परंतू शिवामृत दूध संघाच्या वितरकांच्या सहकार्यामुळे व दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघावरील विश्वासामुळे पुन्हा शिवामृतच्या दूध उत्पादनास चांगले दिवस येत आहेत. आज २० हजार लिटर दूधामध्ये दुग्धजन्य पदार्थ बनवित असलो तरी भविष्यात १ लाख लिटर दुधापासून दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचा आमचा मानस आहे. एकनिष्ठ वितरकांमुळेच हेच शक्य होणार असल्याचे शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले.शिवामृत दूध संघाच्या सर्वाधिक दुग्धजन्य पदार्थ विक्री प्रकारात अकलूज येथील श्रीकृष्ण डेअरीचे नागेश सिद्राम साठे यांनी टॉप परफॉर्मन्सचा बहुमान पटकावित ॲक्टीव्हा गाडीचे मानकरी ठरले. *कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बँक ऑफ बडोदा चे असिस्टंट जनरल मॅनेजर जनार्दन निजासुर यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले.*सुप्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर व संघाचे कन्सल्टंट अनिष सहस्त्रबुद्धे यांनी शिवामृत संघाचे सुपरस्टार, डीलर यांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन कसे करावे, दुसऱ्याच्या चुका शोधण्यापेक्षा आपल्यामध्ये होणाऱ्या चुका दुरूस्त करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल कशी करावी, संघाशी एकनिष्ठ रहावे, आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फुटू नये याबाबत प्रबोधन केले.दुग्धजन्य पदार्थ टॉप परफॉर्मन्स द्वितीय क्रमांक गुरुनाथ सदगीर, तृतीय क्रमांक रज्जाक तांबोळी, दूधामध्ये टॉप परफॉरमन्स प्रकारात प्रथम गणेश गायकवाड, द्वितीय क्रमांक सुभाष पाटील, तृतीय क्रमांक सुधाकरराव देशमुख, न्यू अर्निंग स्टार प्रकारात प्रथम क्रमांक प्रकाश एकतपुरे, द्वितीय क्रमांक सचिन सूर्यवंशी यांनी पटकाविला. पॅकींग दूध विक्री प्रकारात बेस्ट अप्रिशिएशन 3, बेस्ट परफॉर्मन्स् 21, टॉप परफॉर्मन्स् 3 असे 27 व दुग्धजन्य पदार्थ विक्री प्रकारात बेस्ट रिटेलर ॲवॉर्ड 5, बेस्ट परफॉर्मन्स् 18, टॉप परफॉर्मन्स् 3, न्यू अर्निंग स्टार 2 असे एकूण 28 पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.महाबळेश्वर येथे शिवामृत दूध संघाचा द्वितीय पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, व्हा चेअरमन दत्तात्रय भिलारे, माजी बार कौन्सिल अध्यक्ष ॲड.नितीन खराडे, सीनियर ॲड.दिलीव फडे, ॲड.बी.आर.भिलारे, संघाचे संचालक हनुमंत शिंदे, हरिश्चंद्र मगर, संग्रामसिंह रणनवरे, भास्कर तुपे, अरुण थिटे, बाळासाहेब पराडे, जगन्नाथ जाधव, शरद साळुंखे, सुभाष शिंदे, पोपट बर्वे, बाळासाहेब देशमुख, त्रिंबक इंगळे, विजय नरोटे, सुरेश पिसे, सचिन वाघमोडे, अरविंद भोसले, संजय गोरे, दादासाहेब शिंगाडे, कार्यकारी संचालक रविराज इनामदार देशमुख, सेक्रेटरी दिग्वीजय माने-पाटील आदी उपस्थित होते.







