*शालेय जिवनात मिळालेल्या संधीचे मुलांनी सोने करावे :कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील.*
संग्रामनगर दि.४ (केदार लोहकरे यांजकडून)खंडाळी (ता.माळशिरस) येथील सत्यजित बाळू चव्हाण याने दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पथ संचलनामध्ये सहभागी होऊन माळशिरस तालुक्या बरोबर सोलापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे.तो अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात बी.ए.व्दितीय वर्षात शिक्षण घेत आहे.आज त्याचे खंडाळी गावामध्ये आगमन होताच.हालगीच्या कडकडाटात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या की,संस्थेचे माजी अध्यक्ष बाळदादा यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना आपल्या विविध कलागुणांना वाव मिळत असतो आणि यातूनच विद्यार्थी घडत असतात त्याचेच एक उदाहरण म्हणजे शंकरराव मोहिते महाविद्यालयातून आजपर्यंत जवळजवळ 28 विद्यार्थी या राजपथावरती संचलनासाठी गेलेले आपणास दिसून येतात. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांनी आपल्या गावाबरोबर आणि आई- वडिलांबरोबरच शिक्षण प्रसारक मंडळाचे नाव अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचवलेले आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिल्लीत पथसंंचलन करून परतल्यानंतर स्वयंसेवक सत्यजित चव्हाण याचे खंडाळी गावामध्ये गावकऱ्यांनी व मित्र परिवाराने जंगी स्वागत करून गावातून मिरवणूक काढलीदि. 26 जानेवारी 2023 रोजी दिल्ली येथे झालेल्या पथ संंचलनामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचा सत्यजित बाळू चव्हाण यांने महाराष्ट्र टिमचे नेतृत्व केले तो दिल्लीहून परतल्यानंतर दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी गावकऱ्यांनी व मित्रपरिवार त्याचे जंगी स्वागत केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्यजित चव्हाणच्या आई वडिलांचा देखील सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खंडाळी गावच्या सरपंच सुनिता सुरवसे, उपसरपंच सुरेखा पताळे,दत्तात्रय रिसवडकर,रावसाहेब भोसले ॲड.शहाजी इंगवले देशमुख,अविनाश पताळे,अमर रिसवडकर,महेश पठाडे,नाना चंदनकर,अनिल भोसले,मिलिंद खरात,शिवाजी शिंदे,उज्वला सगट,तब्बुसूम सय्यद,कल्याण जाधव,महबूब सय्यद,अतुल सगट,योगेश आबराव,सुधाकर सगट,अण्णा कांबळे,सुरेश सुरवसे,महाविद्यालयातील डॉ.चंकेश्वर लोंढे,डॉ.सज्जन पवार,प्रा.नंदकुमार गायकवाड तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















