*श्री शंकर सहकारी चा वजन काटा अचूक.*वैधमापन तपासणी पाथकाचा अहवाल.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वैधमापन अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यांची ची तपासणी झाली.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वैधमापन भरारी पथकाने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही काट्यांची तपासणी केली असता पूर्वी तपासणी केलेले सील जसेच्या तसे आढळले.श्री शंकर सहकारी साखर कारखान्यावर गेल्या ५० वर्षांपासून ऊस उत्पादकांनी दाखविलेली विश्वासार्ह्यता कारखान्याने जोपासली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर असलेला विश्वास आणखीनच वाढला आहे.या पथकाने सुरुवातीस कारखान्याच्या दोन्ही वजन काट्यांची तपासणी एकच वाहन दोन्हीही काट्यावर फिरवून वजन केले, असता त्यामध्ये कोणताही फरक आढळून आला नाही, तसेच यावेळी काट्यावर २० किलोची प्रमाणित वजने ठेऊन प्रत्यक्ष वजन केले. त्यामध्येही कोणताही फरक आढळून आला नाही.त्यामुळे श्री शंकर सहकारीवर गेल्या ५० वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखविलेली विश्वासार्ह्यता या तपासणीमुळे पुन्हा सिद्ध झाली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात. *जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज झालेल्या वैधमापन विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा श्री शंकर सहकारी कारखान्यावर असणारा विश्वास दृढ झाला.**कार्यकारी संचालक, श्री स्वरूप देशमुख.* वैधमापन पथकाचे अकलूज विभागाचे निरीक्षक ए वाय इंगोले, पुरवठा निरीक्षक एस डी केमकर, लेखापरीक्षक पी आर शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, उपाध्यक्ष दत्तात्रय भोसले, माळशिरस विधानसभा अध्यक्ष साहिल अत्तार तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर रविराज जगताप, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, लेबर ऑफिसर कैलास कदम, सिक्युरिटी ऑफिसर ज्ञानदेव पवार, वाहन चालक, मालक उपस्थित होते.







