अनुसुचित जाती-जमातीत सध्या होत असलेले जात चोरांची घुसखोरी व इतर हक्काच्या मागण्यासाठी अकलूज येथे 16फेब्रुवारी रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
अकलूज (प्रतिनिधी )अनुसुचित जाती-जमातीत सध्या होत असलेले जात चोरांची घुसखोरी व इतर हक्काच्या मागण्यासाठी गुरुवार दिनांक १६/ २ / २०२३ रोजी सकाळी १० वा.अकलूज येथील डॉ. आंबेडकर चौक ते प्रांत अधिकारी कार्यालय,अशा भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक अनुसुचित जाती-जमाती बचाव समिती यांनी दिली.तरी परिसरातील नागरिकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वेळेवर उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.. जीवन जानकर व ज्योती जानकर यांनी हिंदु धनगर ही मुळ जात असताना, अनुसुचित जातीमधील हिंदु-खाटीक या जातीमध्ये घुसखोरी करून बनावट कागदपत्रे काढुन जातीचा दाखला काढला आहे. त्याची चौकशी करून कारवाई करावी. उत्तम जानकर, ज्योती जानकर व जीवन जानकर यांनी खोटा जातीचा बनावट दाखला वापरून आता पर्यंत शासकीय योजनेचा लाभ घेतला आहे का ? त्यांची चौकशी करावी. जीवन जानकर व ज्योती जानकर यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन तहसिलदार यांच्यावर कायदेशिर कडक कारवाई करावी.माळशिरस तालुक्यात असणाऱ्या अनुसुचित जाती-जमातींना विविध शासकीय समितीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे.माळशिरस तालुक्यातील अनुसुचित जाती-जमातींच्या बेघरांना शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी.अशा विविध मागण्यासाठी या मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.






