*माळशिरस तालुक्याच्या वतीने भाजपा -शिवसेना युती सरकारचे धन्यवाद ..*आ. राम सातपुते.*
अकलूज (प्रतिनिधी )ज्यांच्या पिढ्यांनपिढ्या दुष्काळात गेल्या. त्या माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील २२ गावांना हक्काच नीरा देवधरचे पाणी भेटावे म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला .तसेच या मागणीसाठी विधानसभेत आवाज उठवला,पत्रव्यवहार केला. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माळशिरस तालुक्यातील पिंपरी, कारुंडे,लोंढे मोहिते वाडी, लोणंद , गिरवी, रेडे, मानकी, इस्लामपूर, गोरडवाडी, दुष्काळी काही गावांना नीरा देवधर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता भेटली.
*चौकट.* :-
*मला विश्वास आहे येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर होऊन मार्च महिन्यात टेंडर निघेल व कामाला सुद्धा सुरुवात होईल*उर्वरित गावांना सुद्धा विस्तारित धोरणात सरकारने मंजुरी द्यावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे . माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे नंदनवन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे धन्यवाद. भाजपा शिवसेना सेना सरकारचे मनपुर्वक धन्यवाद.. *आमदार राम सातपुते.*







