• होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
  • Login
संघर्ष योद्धा
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय
No Result
View All Result
संघर्ष योद्धा
Home आपले शहर

अकलूजमध्ये ४ फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर! भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

संघर्ष योद्धा प्रतिनिधी by संघर्ष योद्धा प्रतिनिधी
February 1, 2023
in आपले शहर
0
अकलूजमध्ये ४ फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर! भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूजमध्ये ४ फेब्रुवारीला मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर! भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

अकलूज (प्रतिनिधी): पाक्षिक मूकनायक या वृत्तपत्राच्या १०२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवन येथे मूकनायक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रध्देय भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मूकनायक ते प्रबुध्द भारतचा जागर होणार आहे. तरी या परिसंवादास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मूकनायक परिसंवाद कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा व असह्य वेदनांना वाचा फोडण्यासाठी पाक्षिक मूकनायकच्या माध्यमातून समाजप्रबोधनात्मक विद्रोही पत्रकारितेचा वसा हाती घेतला. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचा आवाज बुलंद केला. त्यामुळे शोषितांमध्ये जागृती होऊन अन्यायाविरूध्द संघर्ष करण्याचे बळ त्यांच्यात आले. मूकनायकमुळे समतावादी विचारांची पेरणी झाली, मुक्यांच्या वेदनांना हुंकार प्राप्त झाला व जातीअंताच्या नव्या पर्वाचा उदय झाला. मूकनायकमुळेच समाज प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल करू लागला. प्रत्येक विषयाची समीक्षा करू लागला. मूकनायकमुळे अस्पृश्य, बहिष्कृत समाजाला नवी उमेद मिळाली, स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मंत्र प्राप्त झाला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या प्रखर पत्रकारितेची व मूकनायक या आंबेडकरी चळवळीच्या प्रभावी मुखपत्राचे समाज उन्नतीसाठीच्या योगदानाची जाण ठेवून मूकनायक या वृत्तपत्रास दिनांक ३१ जानेवारी रोजी १०२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त व दिनांक ४ फेब्रुवारीला जनता या वृत्तपत्राचे प्रबुध्द भारत असे नामकरण केल्याचे औचित्य साधून दिनांक ४ फेब्रुवारी रोजी अकलूजमधील पत्रकार नागेश लोंढे, बाळासाहेब गायकवाड, सागर खरात, आनंद लोंढे, डी. एस. गायकवाड, गौतम भंडारे, कैलास कांबळे व सुजित सातपुते या पत्रकारांनी अकलूज येथील अन्नपूर्णा सांस्कृतिक भवनमध्ये मूकनायक परिसंवादाचे आयोजन केले आहे. या परिसंवादास श्रध्देय भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते मूकनायक ते प्रबुध्द भारतचा प्रवास या परिसंवादात मांडणार आहेत. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त तथा बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्र चव्हाण हे महारांचा लष्करी व सांस्कृतिक इतिहास आणि समग्र भीमा कोरेगांव संग्राम या विषयांवर बोलणार आहेत. डॉ. सत्येंद्र चव्हाण यांचा छत्रपती संभाजीराजे यांच्यावर प्रचंड अभ्यास असून ते त्यांच्या सत्य घटनेवर लवकरच चित्रपटही काढणार आहेत. यावेळी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अकलूजचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. तसेच तत्पूर्वी विजय सरतापे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन पहावयास मिळणार असून या कार्यक्रमस्थळी वैचारिक पुस्तकांच्या विक्रीचा स्टॉलही लावण्यात येणार आहे. तरी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार व विचारवंतांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मूकनायक कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

🔴 संघर्ष योद्धा न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा 🔔

Related Posts

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप;                                           नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
आपले शहर

संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!

November 6, 2026
कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
आपले शहर

कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा

November 4, 2026
४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था!                  अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य;                     ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन!                                         अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह;                                                     बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

November 2, 2026
गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार!                                                                 उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य;                                       निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
आपले शहर

गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा

November 1, 2026
अकलूजमधील नव्या शासकीय इमारतीचा वापर कधी होणार?दुय्यम निबंधक कार्यालय तातडीने स्थलांतरित करा; अन्यथा पत्रकार भवनासाठी इमारत द्या !                                                क्रांतिकारी शेतकरी संघटनेची प्रशासनाकडे लक्षवेधी मागणी; पत्रकार शिवराम गायकवाड व रणजितदादा गायकवाड यांचे निवेदन

October 29, 2026
देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”
आपले शहर

देवडीकर दांपत्याचे रुग्ण सेवेमध्ये नवे पाऊल – आ. सतेज पाटील* “माळेवाडी-अकलूज येथे देवडीकर मेडिकल सेंटरचे मोठ्या उत्साहात उद्घाटन”

October 28, 2026
Next Post
उत्तम जानकरच्या इशाऱ्यावर बगलबच्यांनी नाचुन मातंग समाजात तेड निर्माण करु नये.*    सज्जन लोखंडे मानवहीत लोकशाही पक्ष अध्यक्षअकलूज

उत्तम जानकरच्या इशाऱ्यावर बगलबच्यांनी नाचुन मातंग समाजात तेड निर्माण करु नये.* सज्जन लोखंडे मानवहीत लोकशाही पक्ष अध्यक्षअकलूज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत
  • गरजू रुग्णाच्या मदतीसाठी राहुलदादा वाघमोडे पाटील यांचा पुढाकार! उपमुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपचारासाठी आर्थिक मदतीचे पत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य; निमगावच्या बापू साठे यांना दिलासा
Join Whatsapp Group Join Whatsapp Group

आमच्याबद्दल

संघर्ष योद्धा या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. संघर्ष योद्धा या न्यूज पोर्टल संपादक श्री.गणेश लक्ष्मण जाधव आहेत .संघर्ष योद्धा या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून संघर्ष योद्धा  चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही संघर्ष योद्धा मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता संघर्ष योद्धा पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संघर्ष योद्धा जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी  7841847458  या फोन  नंबर वर संपर्क करू शकता.

Categories

  • Uncategorized
  • आपला जिल्हा
  • आपले शहर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • संपादकीय

Live News

https://www.youtube.com/watch?v=oIOnCCljFdw

ताज्या बातम्या

  • अकलूजच्या श्रीराम चित्रमंदिरात मित्रमंडळींसोबत ऐतिहासिक ‘रामायण’ चित्रपटाचा आनंद! भव्य रुपेरी पडद्यावर भारतीय संस्कृतीचा गौरव; रणबीर कपूर, यश, साई पल्लवी यांच्यासह मराठी कलाकार अजिंक्य देव व आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयाचीही विशेष चर्चा!
  • संग्रामनगर ग्रामपंचायतीकडून नागरिकांच्या जीविताशी खेळ?फटाके विक्रीच्या दुकानांना सुरक्षिततेची पाहणी न करताच परवानग्या दिल्याचा आरोप; नियमबाह्य ठिकाणी दुकाने, मोठ्या प्रमाणात साठवणूक!
  • कैलासवासी कमलताई पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज चाकोरे येथे कीर्तन सोहळा
  • ४९ लाख रुपये खर्चूनही रस्त्याची पुन्हा दुरवस्था! अवघ्या काही महिन्यांत खड्ड्यांचे साम्राज्य; ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन! अकलूज–खंडाळी–वेळापूर परिसरातील रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे खड्ड्यांच्या फलकातून स्वागत

क्रिकेट

आपला भेट देण्याचा क्रमांक

web counter
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

No Result
View All Result
  • होम
  • आपले शहर
  • आपला जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • संपादकीय

© 2022 Website Designed By 7841-00-8365

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In