*उत्तम जानकरच्या इशाऱ्यावर बगलबच्यांनी नाचुन मातंग समाजात तेड निर्माण करु नये.* सज्जन लोखंडे मानवहीत लोकशाही पक्ष अध्यक्षअकलूज
मातंग समाजाच्या लोकांची दिशाभुल करून समाजाच्या नावावर स्वतः चा विकास करून घेण्यासाठी आंदोलने, मोर्चा काढून समाजाचा पुळका आला आहे असे भासवून कोणी स्वतः ला मातंग समाजाचा मालक आहे.असं दाखवून स्वतः ची घरे भरून जानकरची कृष्ण-कृत्य दडवण्याचा प्रयत्न करु नये. काही लोकांच्या स्वतः च्या घरात अनेक संघटना असताना मातंग समाज घरच्या संघटनेच्या बँनर खाली एकत्र येत नाही. हे लक्षात आल्यावर समाजाला विकासाच्या प्रश्नावर सोबत घेऊन मालक व्हायला काहीजण प्रयत्न करू लागले आहेत…पक्षाच्या नावावर मोर्चा काढून दाखवा…. मातंग समाज विकासाच्या प्रश्नावर लगेच एकत्र येतो। त्याचा गैरफायदा काही लोक घेऊन आम्ही मातंग समाजाचे मालकच आहोत असे वागू लागले आहेत. जानकर यांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातुन स्वतः मुलगा व मुलगी यांच्या नावे दाखले काढले आहेत.आम्ही जर आज या घटनेच्या विरोधात उभे राहीलो नाही तर भविष्यात आमची मुले आमच्या तोंडात….घालतील ! राहीला प्रश्न मातंग समाजाचा तो तर कोणत्याही नेता कींवा पक्षाचा गुलाम नाही. कोणत्याही व्यक्तीने समाजाचा नेता म्हणून घेण्याआधी आपल्या लेकराच्या तोंडाकडे बघावे व आपल्या लेकाराच्या तोंडातला घास हीसकवणार्या लोकांचे समर्थन करावे की नाही याचा विचार करावा व समाजाची दिशाभूल करु नये.आणि जातीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे समर्थन करु नये. भविष्याचा विचार करावा आणि दलितांच्या बाजुने बोलावे.अन्यथा समाजाच्या लक्षात ही बाब आली तर समाज आपणास कदापी ही माफ करणार नाही.असे पत्रक सज्जनभाऊ लोखंडे मानवहीत लोकशाही पक्ष प.म उपाध्यक्ष यांनी प्रसारित केले आहे.






