*कोल्हापूर सर्किट बेंच ही काळाची गरज त्यास माझा पाठिंबा मुख्यन्यायमूर्ती* *श्री प्रसन्ना बी वराळे** कोल्हापूर दि ३१ (केदार लोहकरे यांजकडून)कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्यन्यायमूर्ती पदी नुकतीच नियुक्ती झालेले श्री प्रसन्ना बी वराळे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता सर्किट हाऊस कोल्हापूर येथे जिल्हा बार असोसिएशने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्री.टी.व्ही.नलवडे उपस्थित होते. त्याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे उपाध्यक्ष ॲड.विवेक घाटगे यांचे हस्ते श्री प्रसन्ना वराळे व सौ वराळे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करणेत आला. मा.मुख्यन्यायमूर्ती श्री प्रसन्ना वराळे यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे न्यायमूर्ती म्हणून कामकाज पहिले आहे. खंडपीठ कृती समितीची जेंव्हा मुख्यन्यायमूर्ती श्री दीपांकर दत्ता यांचा बरोबर मिटिंग झाली तेंव्हा श्री प्रसन्ना वराळे सर हजर असत. त्यामुळे त्यांना कोल्हापूर सर्किट बेचं प्रश्न पूर्ण माहित आहे. यावेळी मा.मुख्यन्यायमूर्ती श्री प्रसन्ना वराळे यांना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सर्किट बेंच स्थापने बाबत निवेदन देण्यात आले.तसेच कोल्हापूर येथे नवोदित वकिलांचे करीता बार असोसिएशन व बार कौन्सिल मार्फत मार्च मध्ये होणारे मार्गदर्शन परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून येणेचे निमंत्रण देण्यात आले. कोल्हापूर येथे सर्किट बेंच होणे ही काळाची गरज आहे.माझा कोल्हापूर सर्किट बेंच मागणीला कायम पाठिंबा आहे असे प्रतिपादन केले.तसेच जुनियर वकिलांचे करीता निरनिराळे योजनांचा विचार होणे साठी महाराष्ट्र शासन, न्यायव्यवस्था,बार कौन्सिल यांचा मार्फत प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड.महादेवराव अडगुळे,कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण,सचिव विजयकुमार ताटे-देशमुख,माजी अध्यक्ष ॲड.संपतराव पवार,ॲड.अजित मोहिते उपस्थित होते.







