अकलूज पोलिसांची कामगिरी.मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन आरोपींना ताब्यात घेवून 4,70,000किमतीच्या १० मोटार सायकल जप्त
अकलूज (प्रतिनिधी )माढा तालुक्यातील विशाल संजय ठोसर (वय २८ वर्षे) व्यवसाय व्यापार रा. भिमानगर, रांझणी ता. माढा, जि. सोलापून यांनी, दिलेल्या फिर्यादी वरून १६/०१/२०२३ रोजी १२.०० वा. ते १३.०० वा. चे दरम्यान यशवंतनगर येथील शिवपार्वती मंदिर चे पार्किंगमध्ये फिर्यादीने त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (तिचा आर टी ओ नंबर एम एच ४५ / एके ८४१३ )ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे ची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४८/ २०२३ भा.द.वि.सं.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग अकलुज चे डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर अकलुज पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पो.स. ई. रामचंद्र हांडे, पोलीस अंमलदार स्वरुपचंद शिंदे,मनोज शिंदे, शिवकुमार मदभावी, अमोल पवार, सुहास क्षिरसागर, विक्रम घाटगे, रामचंद्र चौधरी,सोमनाथ बोराटे अकलूज पोलीस ठाणे व अन्चर आतार सायबर शाखा सोलापूर यांचे पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल आरोपींकडे गुन्हयातील गेलेली मोटार सायकल असलेबाबत माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून १) वैभव तुकाराम यलमार (वय २९ वर्षे, )२) रामचंद्र सुर्यकांत यलमार (वय ४१ वर्षे) दोघे रा. भंडीशेगांव ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचेकडे असलेबाबत माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवून अटक करून अटक मुदतीत तपास केला असता, आरोपींनी एकूण ४,७०,००० /-रु. किमतीच्या त्यामध्ये १ ) ५०,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल तिचा आर टी ओ नंबर एम.एच. ४५/एके ८४१३ असा असून तिचा इंजीन नंबर HA10AHKHH08324 व चेसीज नंबर MBLHAW089KHH21532 असा असून पेट्रोलचे टाकीवर चॉकलेटी पट्टे असलेली नवीन किं.अ. २) ४५,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHAR083HHF49623 व इंजीन नंबर HA10AGHHFG0759 असा असलेली आ.जु.वा. किं.अ., ३) ४५,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHA10BWFHB62707 व इंजीन नंबर HA10EWFHD13941 असा असलेली आ.जु.वा. किं.अ., ४) ४५,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHAR072JHE26764 व इंजीन नंबर HA10AGJHE30122 असा असलेली आ. जु. वा. किं.अ., ५) ४५,०००/- रु. किंमतीची काळया रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर व इंजीन नंबर ग्रॉडरने खेडलेला आ. जु.वा. किं.अ., ६) ५०,००० /- रु. किंमतीची सिल्व्हर रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHAR076HHL06909 व इंजीन नंबर HA10AGHHL07181 असा असलेली आ.जु.वा. किं.अ., ७) ५०,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHA10EZBHA38456 व इंजीन नंबर HA10EFBHA28060 असा असलेली आ. जु. वा. किं.अ., ८) ५०,००० /-रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्रो मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHA10BFFHJ01843 व इंजीन नंबर HA10ERFH101958 असा असलेली आ.जु. वा. किं.अ., ९) ४५,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHA10CGGHC99449 व इंजीन नंबर HA10ERGHC29734 असा असलेली आ.जु.वा. किं.अ., १०) ४५,०००/- रु. किंमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटार सायकल तिचा चेसीज नंबर MBLHAW098K5F13040 व इंजीन नंबर HA10AGKS402409 असा असलेली आ.जु.वा. किं. अ. अशा मोटार सायकल काढून दिल्याने जप्त करण्यात आल्या आहेत.यात अकलूज 1, मोहोळ 2, मंगळवेढा 2, पंढरपूर ग्रामीण 1, पंढरपूर तालुका 1, शिरोळ कोल्हापूर 1, बार्शी शहर 1, सोलापूर शहर 1 अशा एकूण 10 मोटार सायकली आहेत.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र हांडे हे करीत आहेत.







