*शिवशंकर बझारच्या तांदूळ महोत्सवाचे डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; 57 प्रकारचे नामांकित कंपनी चे तांदूळ विक्रीस उपलब्ध*
अकलूज :(प्रतिनिधी )येथील शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्थेच्या शिवशंकर बझार मध्ये तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्हा.चेअरमन अर्जुनराव भगत, संचालक विजयकुमार दोशी, सीनाप्पा वाघमोडे, व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख, सर्व कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.ग्रामीण भागातील ग्राहकांचे आकर्षण ठरलेल्या शिवशंकर बझारमधील या तांदूळ महोत्सवात 57 प्रकारच्या विविध नामांकित कंपनीचे तांदूळ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय ग्राहकांच्या सोईकरीता त्यांच्या पसंतीनुसार बझारने लष्करी कोलम, बासमती शेला, इंद्रायणी, आजारा घण्साळ, आजारा इंद्रायणी, डायेट (लाल उकडा) अशा प्रकारचे महाराष्ट्रातील व महाराष्ट्रा बाहेरील विविध प्रकारचे तांदूळ या महोत्सवामध्ये माफक दरात उपलब्ध करण्यात आले आहेत. हा तांदूळ महोत्सव 28 जानेवारी ते 31 मार्च पर्यंत चालू राहणार असून जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी केले आहे.तांदुळ महोत्सव उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ.स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या वतीने तसेच शिवशंकर बझारचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख व महिला कर्मचार्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.







