माळशिरस तालुक्यातील विझोरी व विजयवाडी येथे 3,68,000 रुपये ची धाडसी चोरी.अकलूज पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
अकलूज (प्रतिनिधी )माळशिरस तालुक्यातील विझोरी येथील सुदाम तुळशिराम शेंडगे( वय 75 वर्षे )व्यवसाय शेती यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अकलुज पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 43/2023 भा.द.वि.सं.क. 457, 380 प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 23/01/2023 रोजी रात्री 11.00 ते दिनांक 24/01/2023 रोजी पहाटे 05.00 वा. चे दरम्यानचे कालावधीत फिर्यादीचे घराचे दरवाजाचा कडीकोयंडा कशानेतरी कट करुन आत प्रवेश करुन विझोरी येथील राहत्या घरातून चोरी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याची नोंद 24/01/2023 रोजी अकलूज पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.यात 3,68,000/- रुपये ची चोरी झाली आहे.त्यामध्ये फिर्यादीचे 1,40,000/- रु. सोन्याचे दागिने त्यामध्ये 2।। तोळे वजनाचे गंठण, अर्धा तोळे वजनाची बोरमाळ, अर्धा तोळे वजनाची अंगठी अशा वस्तू तर कपाटात ठेवलेली रोख रक्कम 53,000/- रु. तसेच 15,000/- रु. किंमत असलेली होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल (नं.एम.एच.45/जे 7834 )त्याचप्रमाणे विजयवाडी येथील अस्लम इस्माईल शेख यांची 40,000/- रुपये किमतीची सोन्याची चैन व अंगठी अंदाजे 1 तोळे वजनाचे तसेच 20,000/- रु. रोख रक्कम अशा स्वरूपाची चोरी झाली आहे.याबाबत थोडक्यात माहिती अशी कि 23/01/2023 रोजी रात्री 11.00 ते दिनांक 24/01/2023 रोजी पहाटे 05.00 वा. चे दरम्यानचे कालावधीत फिर्यादी यांच्या घराचे किचन रुमचे दरवाजाचा कडीकोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने कशानेतरी कट करुन आत प्रवेश करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोटार सायकल तसेच अस्मल इस्माईल शेख रा. विजयवाडी यांचे असे एकुण अंदाजे 3,68,000/- रुपये किंमतीचे हे चोरी करून चोरुन नेले आहेत म्हणून फिर्यादी ने अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार केली आहे. दरम्यान चोरीचे गांभीर्य ओळखूण गुन्हयाचे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व अकलूज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.तसेच फिंगरप्रिंट पथकास कळविण्यात आले असून तपासीक अंमलदार यांना सुचना देण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोसई रामचंद्र हांडे हे करीत आहेत.







