तीस वर्षाच्या भेटीनंतर दत्त चौक गहिवरलामाळीनगर येथे दत्तचाळीतील मित्र मैत्रिणींचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा माळीनगर दि . २२ – येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या दत्तचाळीत राहणाऱ्या कामगार व त्यांच्या परिवाराचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . तब्बल तीस वर्षानंतर भेटलेले मित्र मैत्रिणीं एकमेकांच्या गळाभेटीने गहिवरून गेले . माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या कामगार वसाहतीत सन १९५० ते १९९० दरम्यान दत्त चाळीत वास्तव्यास असणाऱ्या कामगारांनी व त्यांच्या परिवाराने सौभद्र मंगल कार्यालयात स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते . या मेळाव्याचे उद्घाटन कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या हस्ते व पूर्णवेळ संचालक सतीशराव गिरमे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले . या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने सूर्यकांत भिसे संपादित ” आठवणीतले माझे गांव – माळीनगर ” या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . या स्नेह मेळाव्यास दत्त चाळीच्या १६ कामगार वसाहतीतील माजी कामगार व त्यांचे दोन हजार नातेवाईक उपस्थित होते . प्रारंभी या मेळाव्याचे संयोजक दीपक थोरात यांनी स्नेह मेळाव्याची पार्श्वभूमी विषद करुन दत्त चाळीतील हा एक ऐतिहासिक मेळावा असल्याचे सांगितले . या मेळाव्याच्या निमित्ताने कॅप्टन आमसिध्द भिसे , डॉ विद्युत शहा , स्नेहल बाळसराफ , संजय राऊत , सूर्यकांत भिसे , जहांगीर खान , भास्कर चंदनशिवे , अनिल झगडे , माजी सैनिक राजेंद्र तारू, अनिल कुदळे, निरंजन बोरावके , लाला शेख आदींनी आपले मनोगत व्यक्त करीत चाळीस वर्षापूर्वीचे शालेय जीवन व चाळीतील आठवणींना उजाळा देताना अनेकांचा कंठ दाटून आला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री दत्त युवक मंडळातील दीपक थोरात, उमेश होले, नामदेव जोशी , प्रदीप बोरावके, राजु जगताप,बापूसाहेब राऊत,संग्राम भोसले, गणेश माने, रमेश गायकवाड, विनायक राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. सविता पांढरे – क्षीरसागर यांनी केले.

फोटो ओळी : ” माळीनगर : आठवणीतले माझे गांव ” या सूर्यकांत भिसे संपादित पुस्तकाचे प्रकाशन करताना दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन राजेंद्र गिरमे , पूर्णवेळ संचालक सतीशराव गिरमे , डॉ विद्युत शहा , कॅप्टन आमसिध्द भिसे , स्नेहल बाळसराफ आदी . फोटो : कलासंगम , माळीनगर







