स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नाला यश….. दीपक सावंत
माळशिरस तालुक्यातील दसुर येथील पुणे पंढरपूर हायवे तोंडले ते दसुर या ठिकाणी जाणारा कॅनॉलचे काम आवताडे कंट्रक्शन च्या चुकीमुळे सदरचे काम निकृष्ट प्रकारचे झाले होते. पाटबंधारे उपविभागीय अधिकारी देशमुख साहेब व पाटबंधारे तोंडले शाखेचे चौधरी रावसाहेब यांना सदर कॅनॉलच्या दुरुस्तीचे पत्र दिनांक 16.2.2022 रोजी दिले होते .त्याची तातडीने दखल घेत तोंडले ते दसुर जाणारा 19 नंबर फाटा काम पूर्ववत करण्याचे सुरुवात झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी बांधव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशेष आभार मानत कौतुक व्यक्त केले आहे. माळशिरस तालुक्यामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय दिशादर्शक काम होत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. दीपक सावंत यांनी पाठपुरावा केल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.✍🏻 विजय चव्हाण.








