महाराष्ट्र केसरी च्या पंचांना धमकी दिल्याप्रकरणी पै. संग्राम कांबळे यांचेवर खोटा गुन्हा दाखल -दिपक जाधव
अकलूज (प्रतिनिधी )पुणे येथे झालेल्या 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील फायनल कुस्ती मध्ये पै. सिकंदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत चुकीच्या पद्धतीने पै.महेंद्र गायकवाड यांना 4गुण देण्यात आले. त्यामुळे पै. सिकंदर शेख यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पै. सिकंदर शेख यांचेवर अन्याय झाला आहे. म्हणून श्री शाहू विजयी गंगावेश तालीम कोल्हापूर चे पै. संग्राम कांबळे यांनी महाराष्ट्र केसरी चे पंच मारुती सातव यांना फोन करून केवळ काही प्रश्न विचारले. म्हणून मारुती सातव यांनी आपल्याला धमकी दिली म्हणून कोथरूड पोलीस ठाणेत पै. संग्राम कांबळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या पार्श्वभूमीवर गंगावेश तालीम चे अध्यक्ष दिपक जाधव यांनी एक प्रसिद्धी पत्रक दिले असून,सदर कुस्ती मध्ये पंच यांनी सिकंदर शेख याचेवर अन्याय केला आहे.अशी आमची सर्वांची भावना आहे.आणि आमच्या तालमी चे पै. संग्राम कांबळे यांच्यावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.असे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.दरम्यान महाराष्ट्र केसरीचे पंच मारुती सातव यांना पैलवान संग्राम कांबळे यांनी धमकीचा फोन केला यासंदर्भात बोलताना सिकंदर म्हणाला की, संग्राम कांबळे यांनी कोणतीही धमकी दिली नाही.ती रेकॉर्डिंग मी ऐकलेली आहे त्यामध्ये कोणतीही शिवीगाळ नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कोणताही गोष्ट तेथे घडलेली नाही.प्रत्येक पैलवानाला अन्यायाबद्दल विचारण्याचा हक्क आहे.माझ्यावर प्रेम करणारे सर्व फोन करून विचारतात.आज हे विचारलं नाही तर पुढच्या काळातही हे चालत राहील.मी आतापर्यंत खूप वेळा हरलो आहे मात्र माझा संघर्ष सुरूच राहील. माझी हार माझे आई-वडील आणि कोच सहन करू शकले नाहीत ते अजून सुद्धा दुःखात असल्याचे सिंकदर याने म्हटलं आहे.







