*माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ उत्साहात संपन्न*
मा. आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे केमिस्ट क्रिकेट चषक स्पर्धा 2023 मध्ये माळशिरस तालुका केमिस्ट संघाचा सलग आठव्यांदा विजय झाल्याबद्दल माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेकडून खेळाडूंचा सत्कार समारंभ दिनांक 15 जानेवारी रोजी मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुक्यातील केमिस्ट बांधव जे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडुन आले त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी उपस्थित मा. श्री.राजशेखर बारोळे (सोलापूर जिल्हा सचिव), मा. श्री. राजेश विरपे (सोलापूर जिल्हा खजिनदार), मा.श्री. प्रशांत खलीपे (सोलापूर जिल्हा संघटक सचिव), मा. श्री. सिद्धेश्वर घाळे (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), मा.विठ्ठल गायकवाड(अध्यक्ष, माळशिरस तालुका) व मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. विठ्ठल गायकवाड यांनी विजयी संघाचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच *माळशिरस तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या स्वीकृत सदस्य पदी मा.श्री. शंकर पवार, मा.श्री. प्रदीप भोरे व मा. श्री. अतुल आर्वे यांची नियुक्ती करण्यात आली*. यावेळी सूत्रसंचालन श्री शंकर पवार यांनी केले तर आभार श्री रणजित महाडीक यांनी मानले.







