*माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट*
संग्रामनगर दि.१३ (केदार लोहकरे यांजकडून)मुंबई येथे कोल्हापूर, सांगली, सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांकरिता “कोल्हापूर” येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करणेबाबत सर्वपक्षीय बैठक झाली होती.त्यानुसार न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र पाठवून “कोल्हापूर” येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बँक स्थापन करणे बाबत विनंती करण्यात आलेली होती.तसेच महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत सकारात्मक ठराव देखील झालेला आहे.परंतु यावर अद्याप याबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. सदर विषयाच्या अनुषंगाने “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती”च्या शिष्टमंडळाने माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेऊन याबाबत सरकारकडे आपला हा प्रश्न मंडण्याकरिता विनंती केली होती.त्यानुसार आज माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्री यांनी आपण “मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर खंडपीठ कृती समिती” समवेत लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके व सचिव ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले निवेदन व चर्चा बाबत फोनवरून माहिती दिली.लवकरच मुख्यमंत्री व खंडपीठ कृती समिती यांची येत्या आठवड्यात बैठक आयोजित करू असे सांगितले.सदाभाऊ खोत यांनी दिनांक 9/1/2023 रोजी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनला सदिच्छा भेट दिली होती.त्यावेळी सर्किट बेच बाबत निवेदन दिले होते.सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री साहेब यांची घेतले भेटीने अंतिम टप्यात आलेल्या सर्किट बेंच मागणीला गती येईल.







