चौंडेश्वरवाडीच्या उपसरपंच पदी अनिल कोयले
अकलूज
माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अनिल कोयले यांची निवड झाली आहे.चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. आठ ग्रामपंचायत सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पद निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील पॅनल कडून अनिल कोयले यांचा अर्ज तर जनसेवा पॅनल कडून सचिन सोनवणे यांचा अर्ज दाखल झाला होता यामध्ये अनिल कोयले यांनी बाजी मारली असून चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत सदस्य शीला गायकवाड, सुजाता शिंदे ,सोनाली गवळी, विजया माने, संगीता एकतपुरे, प्रशांत मोहिते, सचिन गिरमे यांनी सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बर्वे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामसेवक अशोक सावंत हेही उपस्थित होते. यावेळी उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर विविध पक्ष संघटनांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज गावचे, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,शंकरनगरचे उपसरपंच सत्यशील मोहिते पाटील, अकलूज गावचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौंडेश्वरवाडी ग्रामपंचायत सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.







