दिव्यांगजनांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीभारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत अकलूज येथे 14जानेवारी रोजी मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप
अकलूज (प्रतिनिधी )सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ६७ ठिकाणी सामाजिक अधिकारिता शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.यांच्या माध्यमातूनदिव्यांगजनांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीभारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप14 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 10.00 वा.कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल, अकलूज जि.सोलापूर या ठिकाणी होणार आहे.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकार चे राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, चे रामदास आठवले,तर अध्यक्ष माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी उप मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,दक्षिण सोलापूर विधानसभा चे आमदार सुभाष देशमुख,तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये विधानपरिषद चे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील,माळशिरस विधानसभा चे आमदार राम सातपुते,इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक क्रियान्वयन संस्था : भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), कानपूर सहयोग : जिल्हा प्रशासन, सोलापूर (महाराष्ट्र)यांच्या वतीने करण्यात आले आहे.







