*कोल्हापूर येथे सर्किट बेंच मागणीकरीता प्रसाद जाधव मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये धावणार*
कोल्हापूर दि.१३ (केदार लोहकरे यांजकडून)मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सहा जिल्हा करीता कोल्हापूर येथे स्थापन व्हावे या मागणीसाठी सिटीजन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव हे रविवारी होणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत.त्याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समिती वतीने प्रसाद जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. सहा जिल्ह्यातील जनतेसाठी सर्किट बेंच होणे आवश्यक आहे.सर्किट बेंच लढा अंतिम टप्यात असतानाही तो पूर्ण होत नाही यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.त्यामुळे या गोष्टीकडे सरकार व न्याय व्यवस्था यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसाद जाधव हे रविवारी 42 किलो मीटरची धाव घेणार आहेत,या अगोदर देखील मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला आहे व सर्किट बेंच मागणी बाबत लक्ष वेधले आहे . यावेळी खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अँड.गिरीश खडके,उपाध्यक्ष अँड.सुधीर चव्हाण,सचिव अँड.विजयकुमार ताटे देशमुख यांनी पुष्पगुच्छ शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रसाद जाधव म्हणाले की,मी सहा जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरिक,पक्षकार यांचे वतीने ही लक्षवेधी धाव सर्किट बेंच मागणी करीता असणार आहे.तसेच सदर मॅरेथॉन मध्ये ते हायकोर्ट मुंबई परिसरात अतिरिक्त अनोख्या पद्धतीने धाव घेणार आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके,उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण,सचिव ॲड.विजयकुमार ताटे-देशमुख माजी अध्यक्ष ॲड.प्रकाश मोरे, ॲड.सूर्यदीप भोसले,ॲड.राजेंद्र पाटील,ॲड.बाबा,ॲड.किरण महाजन,ॲड.महांतेश कोल्हे,ॲड.प्रमोद दाभाडे, ॲड.सचिन आवळे,ॲड.सचिन कलस,तसेच कोल्हापूर नागरिक राजेंद्र थोरवड,विकास सावंत,निवास ब्रम्हपुरे,सुनील महाडिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







