[] प्रतापसिंह मोहिते पाटील इंग्लिश स्कूल संस्थेस स्टार एज्युकेशन अवॉर्ड []
खंडाळी (प्रतिनिधी)[]
अकलूज (ता. माळशिरस) येथील प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल संस्थेस स्टार एज्युकेशन २०२३ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेहरू सेंटर वरळी, मुंबई येथे मेस्टा ऑरगॅनिझेशन आयोजित कार्यक्रमात प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल, अकलूज संस्थ्येच्या संस्थापिका अध्यक्ष उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
[]शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातून सोलापूर जिल्हयातील प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल, अकलूज या संस्थेस हा पुरस्कार देण्यात आला.
[] या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,सर्वा. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आ. बच्चू कडू, आ.संजय केळकर, आ.राजू पाटील, आ. महेश चौगुले उपस्थित होते.[]







