*राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी धर्मांधतेचे आचरण न करता मानवधर्म श्रेष्ठ असल्याची जनतेला शिकवण दिली.प्राचार्य डॉ.विश्वनाथ पाटील.*
कोल्हापूर दि.१२ (प्रतिनिधी)”राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही.उलट सर्व धर्मानी मानवाला श्रेष्ठ स्थान दिले आहे,”असे प्रतिपादन येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांनी केले. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विषयी महाविद्यालयात निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.याप्रसंगी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षिका प्रगती पाटील आणि समृद्धी जाधव यांनी भाषणात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास,सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.याप्रसंगी प्रा.डी.डी.पाटील,क्रीडा विभाग प्रमुख प्रा.प्रकाश बंडू बुगले व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांसह सेवक तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी-शिक्षकांनी यशवंत हायस्कूल,कोडोली व हॉवर्ड मेमोरियल हायस्कूल,कोडोली येथील शालेय आंतर वासीतामध्ये जयंती कार्यक्रमात सहभाग घेतला.तेथे येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पद्मश्री पाटील यांनी केले तर सीमा चोपडे यांनी आभार मानले.







