*सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांच्या तक्रारीची दखल महाराष्ट्र राज्य अनुसुचीत जाती जमाती अयोग मुंबई यांचे सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला प्रकरणाचा खुलासा देण्याचे आदेश
*अनुसुचीत जाती मध्ये होणाऱ्या अतिक्रमण बाबत अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांनी लेखी तक्रारी वरुन अनुसुचीत जाती जमाती अयोग यांनी सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला लेखी खुलासा मागविण्यात आलेला आहे. या कारवाई मुळे अनुसूचीत जाती व जमाती मधिल घटकांचे हक्क अबादित राहाणार आहे.असे खोटे कागदपत्रे गोळा करुन अनुसूचीत जाती मध्ये वेळापूर येथिल जानकर कुंटुब घुसखोरी करण्याच्या तयारीत असतानाच अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांनी वेळीच तक्रार करुन या घुसखोर जानकर कुटुंबा विरुद्ध तक्रार केली आता अनुसूचीत जाती जमाती आयोग मुंबई यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे सोलापूर येथिल जात प्रमाणपत्र समितीला देखील या अनुसूचीत जाती जमाती आयोगाच्या पत्रामुळे धारेवर धरण्यात येणार आहे. लालासाहेब अडगळे यांनी महाराष्ट्रात विविध कार्यालयात या प्रकरणा बाबत लेखी तक्रारी केलेल्या होत्या. त्या वेगवेगळ्या कार्यालयातून सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समीतीला जाब विचारले जात आहेत.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचीत जाती मधिल लोकांच्या हक्काच्या आरक्षणावर आशा लोकांन कडून सतत वेगवेगळ्या पध्दतीने अन्याय अत्याचार होत आहेत. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन अकलूज येथिल सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे यांनी आशा लोकांना ठेचुन काढण्यासाठी पाऊल उचलले आहेत. आता येणाऱ्या काळातील निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन उत्तम जानकर व जानकर कुटुंब यांनी जो अट्टाहास रचलेला होता हिंदु-खाटीक प्रमाणपत्र मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.येणार काळ हा अनुसुचीत जातींन साठी महत्त्वाचा ठरणार आहे. अनुसूचीत जाती मधिल प्रत्येक घटकांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे असे मत लालासाहेब अडगळे यांनी व्यक्त केले आहे.







