महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊली ने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा.आत्तापर्यंत जे थोर स्त्री-पू पुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेले व ज्यांनी आपल्या कर्तबगारीने रण गाजवले त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करणे व अभिनंदन करणे हे आवश्यक असले, तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही. महाराष्ट्रालाच नाही, तर देशातील निरनिराळ्या जातीचे प्रेम एकाच ठिकाणी बसण्यासारखे स्थळ सांगावयाचे झाले तर ते राष्ट्रमाता जिजाऊंचे आणि छत्रपती शिवरायांचे चरित्र होय.आई जिजामाता सिंदखेडचे राजे निजामशाहीचे शूर व स्वतंत्र बाण्याचे सरदार लखुजीराजे जाधव यांची लाडकी लेक जिजाऊ म्हणजेच राजमाता जिजामाता शहाजीराजे भोसले. जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई यांना दूत्ताजी, अचलोजी, बहादूरजी, राजे, राघोजी अशी चार होती. त्यांच्या पाठीवर १२ जानेवारी १५९८ रोजी सकाळी मुले च्या सुमारास जिजाऊंचा ‘सिंदखेड राजा’ येथे जन्म झाला. चार मुलांच्या पाठीवर मुलगी झाल्याची आनंदाची बातमीऐकताच वडिल लखुजी राजेंनी सिंदखेड राजा नगदीत आनंदोत्सव साजरा केला गुढ्या तोरणे उभारून जिजाऊंच्या जन्माचे स्वागत झाले गोर-गरिबांना अन्नधान्य, मिठाई शेतजमिनी वाटण्यात आल्या.जन्मापासूनच आसमंत दणाणून टाकणारी जिजा शिक्षण, मैदानी खेळ, युद्धकला, वाजनिती, घोडदौड, न्यायदान यात वयाच्या नवव्या वर्षीच तरवेज झाली जगदेवराव ‘काका व बंधू दत्ताजी यांच्यासोबत प्रत्यक्ष तलवार, भालाफेक, घोडदौड, बंदुकी, निशाणी, न्यायखात्प अशी सर्व प्रात्यक्षिके केली. तसेच म्हाळसाराणींनी उत्तम शिक्षक नेमून त्यांना सर्व विषयांचे शिक्षण दिले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना सदा भाषा अवगत होत्या.जिजाऊ अत्यंत तेजस्वी, बुद्धिमान, राजनिती निपुण, युद्धशास्त्राची जाणती, विज्ञानवादी, भाषाप्रभुत्व असणारी जिजाऊ इ.स. १६१० मध्ये शहाजीराजे मालोजी राजे भोसले या तेवढ्याच तोडीच्या उमद्या पाटलाच्या पोबाची पत्नी झाली: देवगिरीच्या वैभवशाली यादव साम्राज्याची उपशाखा असलेल जाधवरावांचे घराणे जसे मराठ्यांमध्ये सुप्रतिष्ठित मानले गेले त्याचप्रमाणे मेवाडच्या सिसोदिया वंशाच्या पराक्रमाचा वारसा सांगणारे ‘महाराष्ट्रातील विकळचे भोसले घराणेही तेवढेच तोलामोलाचे होते. पुढे शहाजीराजे व जिजाऊंच्या पोटी प्रतापी संभाजीराजे व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे या दोन नररत्नांनी जन्म घेतला.थोरले संभाजीराजे शहाजी राजांजवळ वाढले, तर शिवाजी राजांची सर्व जबाबदारी जिजाऊंनी स्वीकारली. काही कारणांमुळे जेंव्हा भोसले व माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले, तेंव्हा त्यांनी पत्ती निष्ठेला अधिक महत्त्व दिले. जिजाऊ ह्या केवळ शहाजी राजेंच्या ‘वीरपत्नी नव्हत्या, तर जगातील प्रत्येक स्त्रीने “आदर्श घ्यावा, अशा आदर्श माता होत्या. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी राजामध्ये पाहणाऱ्या त्या महान राष्ट्रमाता होत्या. त्यांनी स्त्री ही क्षणकालाची पत्नी व अनंत कालाची माता हे स्वप्न पूर्ण करून दाखविले. जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी व रयतेसाठी घडविले.हीच जिजाऊ जिच्या प्रेरणेने उनके स्वराज्यजोती हीच जिजाऊ जिने घडविले श्री शिवछत्रपती अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान पुत्र घडविला ऐसा, जो राष्ट्राची शान देश प्रितीचे धडे गिरविले, तिजपाशी बसुनीधन्य जिजाऊ धन्य जिजाऊ नमन तिला करुनी ।” जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्यासाठी रयतेसाठी घडवले. त्यांनी शिवबाला लहान वयात रामायण महाभारतातील शूर-वीरींच्या गोष्टी सांगितल्या. दादाजी कोंडदेवांच्या सहकार्याने शिवरायांना राजकारण व शस्त्रविद्येत कुशल बनविले. शिवरायांवर उत्तम संस्कार केले. सर्वांना समान व योग्य न्याय देण्याचे धडे दिले. त्यामुळे स्वराज्यात कधीही कोणत्याही माणसावर अन्याय झाला नाही. जिजाऊंनी आयुष्यभर शिवरायांना प्रेरणा दिली. त्यांनी व शिवरायांनी उत्तम सुशासन व प्रशासन केले त्यांनी पुण्याचा विकास, राज्यकारभार चोख हाताळणे, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणे, शेतकऱ्यांना मदत करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या.निजामशाहीच्या रक्षणासाठी शहाजी मोघलांविरुद्ध लढले परंतु निजामशाहीच्या दरबारात शहाजी- राजेंचा कपटाने खून करण्यात आला. त्यामुळे, जिजाऊंना खूप मोठा हादरा बसला तरीही स्वराज्याची संकल्पना शिवबांच्या हातून जिजाऊंनी यशस्वीपणे पूर्ण केली… भारतातील परकीय, मुस्लिम राजवटींना हादरा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवरायांनी केले. शिववायांनी केवळ एक राजवट प्रस्थापित करण्यासाठी आपले सारे सामर्थ्य पणाला लावले असे नाही तर येथील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण अमूलाग्र बदलवून टाकण्याच्या दृष्टीने आपली सारी शक्ती एकवटली होती. त्या काळामध्ये शहाजीराजेंच्या मागे सती न जाता शिवनांच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. पौरोहित्य नाकारण्याचे साहस ठेवले.६ जून १६७४ रोजी शिवरायांचा | स्वराज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.जिजाऊंचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले. शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेला प्रजाहितदक्ष राजा लाभला. अशा प्रकारे तीन पिढ्यांचे राजा व छत्रपती पाहण्याचे भाग्य जिजाऊंना लाभले. शिवाजी राजेंच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहून काही दिवसातच १७ जून १६७४ रोजी या थोर महामाऊलीने स्वराज्याला पोरकं करून अखेर कायमचा निरोप घेतला. स्वराज्याचे एक मायेचे हक्काचे छत्र, आदर्श राजमाता, स्वराज्य जननी जिजाऊंच्या रूपाने काळाच्या पडद्याआड गेल्या.”मुजरा माझा माता जिजाऊला, घडविले तिने शूर शिवबाचा साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी इतिहासा, तू मागे वळूनी पहा, पाठीमागे जरा,झुकवूनी मस्तक करशील, जिजाऊंना मानाचा मुजरा “प्रोफेसर -मीनाक्षी अमोल जगदाळे.जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष.सोलापूर. पंढरपूर विभाग. अकलूज







