अकलूज येथील राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा समारोप अकलूज (प्रतिनिधी)
येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्यावतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या १७व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेचा समारोप झाला. दिनांक ९ व १० जानेवारी या कालावधीत सदरच्या स्पर्धा विजय चौक अकलूज या ठिकाणी पार पडल्या.
विजेत्या संघांना स.म. शंकराव मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रदीपराव खराडे, दीपकराव खराडे, अँड. नितीनराव खराडे, महादेवराव अंधारे, लक्ष्मण आसबे, सुभाष दळवी, राजाभाऊ लव्हाळे, शि.प्र.मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे, यांचे सह शिक्षण प्रसारक मंडळ, सहकार महर्षी साखर कारखाना, संग्रामसिंह मित्र मंडळ यांचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, खेळाडू, वर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्या दिवशी झालेल्या ग्रामीण ब मूले गटात प्रथम क्रमांक (विभागून) श्री गणेश विद्यालय पिंपळनेर व सदाशिवराव माने विद्यालय मानकी यांनी पटकावला. तर द्वितीय रामलिंग विद्यालय कुरबावी, तृतीय मोरजाई विद्यालय मोरोची यांनी पटकावला प्राथमिक गटात प्रथम सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज, द्वितीय महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर, तृतीय (विभागून) श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर यांनी पटकावला. ग्रामीण ब मुलींच्या गटात प्रथम श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते, द्वितीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे व तृतीय संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूर यांनी पटकावला. खुला मुलींच्या गटात प्रथम शंकराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज व द्वितीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय अकलूज यांनी पटकावला शहरी मुलं या गटात प्रथम क्रमांक (विभागून )महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला यशवंतनगर व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज तर द्वितीय श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी पटकावला.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण गट अ मुले प्रथम श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली, द्वितीय श्री सावता माळी विद्यालय माळेवाडी, तृतीय कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय सदाशिवनगर, ग्रामीण अ मुली प्रथम श्री हनुमान विद्यालय लवंग, द्वितीय कर्मवीर बाबासाहेब माने पाटील विद्यालय सदाशिवनगर, तृतीय श्री विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली, खुला गट मुले प्रथम विभागून शंकराव मोहिते महाविद्यालय अकलूज व कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय वस्तीगृह मोरोची, द्वितीय विजय विद्यार्थी वस्तीगृह अकलूज, तृतीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय अकलूज, शहरी गट मुली प्रथम विभागून महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला शंकरनगर, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज, व लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर द्वितीय सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी बक्षिसे पटकावली तर उत्कृष्ट प्रशिक्षक हनुमंत भोसले, हलगी वादक दादासाहेब चव्हाण, घुमके वादक आनंद केंगार, शिंगाडे वादक पांडुरंग साठे यांना प्रत्येकी एक हजार रु. व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुढील वर्षी खुल्या गटासाठी प्रथम ७५हजार, द्वितीय ५० हजार, तृतीय २५ हजार व चौथा पंधरा हजार अशी बक्षिसे देणार असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केले. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी, शकील मुलानी, ईलाई बागवान यांनी केले. आभार सचिव संजय राऊत यांनी मानले.मंडळाच्या सर्व सदस्यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.












