अकलूज पोलिसांकडून घरफोडी चोरीतील आरोपीचा 2 तासात शोध लावून पैसे चोरटयाकडून हस्तगत
अकलूज (प्रतिनिधी )अकलूज येथील विनायक काशिनाथ आडत (वय 37 वर्षे )व्यवसाय मोबाईल शाॅपी रा. सुधीर पोटे यांचे जागेत जुने एस टी स्टॅंड जवळ, अकलूज यांनी दिलेल्या फिर्यादी वरून ते 09/01/2022 रोजी 21.00 वा. मोबाईल शाॅपीचे दुकान व राहत असलेली खोली बंद करुन वेळापूर येथे आई वडीलांकडे घरी कुटुंबासह गेले होते. दिनांक 09/01/2023 रोजी 20.00 ते दिनांक 10/01/2023 रोजी सकाळी 10.00 वा. चे दरम्यानचे कालावधीत सुधीर पोटे यांचे जागेमध्ये असलेले फिर्यादीचे संग्राम मोबाईल शाॅपी दुकान कोणतीतरी अज्ञात चोरटयाने प्रवेश करुन दुकानाचे पाठीमागील प्लायऊडचा दरवाजा कशानेतरी फोडून आत प्रवेश करुन घरफोडी चोरी करून 70,000/- रुपये चोरुन नेले आहेत. अशी फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 24/2023 भा.द.वि.कलम 457, 380 प्रमाणे दिनांक 10/01/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग डाॅ. बसवराज शिवपूजे, पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांचे मार्गदर्षनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनिल जाधव, सुहास क्षिरसागर, रामचंद्र चैधरी, मनोज शिंदे, प्रविण हिंगणगांवकर यांनी गोपनीय बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती काढून आरोपी गोपाळ दत्तात्रय क्षिरसागर (वय 21वर्षे )रा. पिटेवाडी ता. इंदापूर हल्ली रा. आझाद चैक अकलुज ता. माळशिरस याने केला असल्याचे निश्पन्न झाल्याने त्यास दोन तासात शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता, सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यास अटक करुन त्याने अटक मुदतीत 70,000/- रुपये काढून दिल्याने जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकाॅ/311 बजरंग बोराटे हे करीत आहेत.






