हलगी तुतारीच्या निनादाने अकलूज परिसर दुमदुमला…..
अकलूज येथे १७ वी राज्यस्तरीय लेझीम स्पर्धा..
. अकलूज (प्रतिनिधी) हलगीच्या ठेक्याने व तुतारीच्या निनादाने अकलूज परिसर दुमदुमून गेला असून खेळाडूंच्या उत्साहाला उधाण आलेले आहे. येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्यावतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या १७व्या राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत खेळाडूंनी सांघिक खेळातून बेफाम सादरीकरण केले. मुला मुलींच्या संघांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या ग्रामीण ब गटात प्रथम क्रमांक (विभागून) श्री गणेश विद्यालय पिंपळनेर व सदाशिवराव माने विद्यालय मानकी यांनी पटकावला. तर द्वितीय रामलिंग विद्यालय कुरबावी, तृतीय मोरजाई विद्यालय मोरोची यांनी पटकावला प्राथमिक गटात प्रथम सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज, द्वितीय महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर, तृतीय (विभागून) श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील विद्यालय वेळापूर यांनी पटकावला. ग्रामीण ब मुलींच्या गटात प्रथम श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय नातेपुते, द्वितीय रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मांडवे व तृतीय संभाजी बाबा विद्यालय इस्लामपूर यांनी पटकावला. खुला मुलींच्या गटात प्रथम शंकराव मोहिते पाटील महाविद्यालय माळेवाडी अकलूज व द्वितीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय अकलूज यांनी पटकावला शहरी मुलं या गटात प्रथम क्रमांक (विभागून )महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रशाला यशवंतनगर व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज तर द्वितीय श्री जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी पटकावला. विजेत्या संघांना सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, मित्र मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्ष कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, सयाजी राजे मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन व प्रशिक्षकांचा सन्मान करून गौरवण्यात आले. स्पर्धेसाठी मंडळाचे संजय राऊत, बिभीषण जाधव, सुजित कांबळे, संदीप शिंदे, अर्जुन बनसोडे, विशाल दळवी, किरण सूर्यवंशी,ईलाई बागवान, शकील मुलांनी, राजू गोरे, फिरोज तांबोळी, राजू देवकर, महादेव शिंदे, गणेश दळवी, नामदेव कुंभार, रावसाहेब मगर, रशीद मुलांनी यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.
चौकट……
वयाच्या 75 व्या वर्षीही जयसिंह मोहिते पाटील यांनी खेळाडू सोबत दिमाखदार व उत्साहवर्धक खेळ सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले .








